निवडणुकीमधल्या विजय आणि पराभवानंतर काही उमेदवारांचे डिपॉजिटही जप्त केले जाते. उमेदवाराला मिळालेल्या मतांवरून ठरतं की डिपॉजिट जप्त होणार की नाही. असे तेव्हा होते जेव्हा कोणताही उमेदवार निर्धारित केलेल्या किमान मतांची संख्या देखील मिळवू शकत नाही. आज ५ राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया कोणत्या प्रसंगी उमेदवाराची डिपॉजिट केलेली रक्कम जप्त होते आणि कोणत्या वेळी त्याला निर्धारित मते न मिळाल्यावरही ही रक्कम परत दिली जाते.

प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी निर्धारित केलेली रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. यालाच डिपॉजिट रक्कम म्हटले जाते. जर कोणताही उमेदवार निवडणुकीमध्ये एकूण मतांच्या एक षष्ठांश मतंही मिळवता आली नाहीत, तर त्याच्याकडून जमा केलेले डिपॉजिट आयोगाकडून जप्त केले जाते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

UP Election Result 2022: ट्विटरवर EVMsचा ट्रेंड! नेटिझन्सने शेअर केले भन्नाट मिम्स

डिपॉजिट रक्कम किती असते?

ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा ते राष्ट्रपती निवडणूक अशा प्रत्येक निवडणुकांसाठी डिपॉजिट रक्कम वेगवेगळी असते. या निवडणुकीमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवाराला एक निर्धारित रक्कम डिपॉजिट करावी लागते. तथापि, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सामान्य श्रेणी आणि एससी-एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वेगवेगळी रक्कम निर्धारित केलेली असते. तसेच, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी सर्व उमेदवारांसाठी एकच रक्कम निर्धारित केली जाते.

  • लोकसभा निवडणुकीसाठी सामान्य श्रेणीच्या उमेदवारासाठी डिपॉजिट रक्कम २५ हजार रुपये आहे, तर एससी आणि एसटी श्रेणीच्या उमेदवारांसाठी ही रक्कम १२,५०० इतकी आहे.
  • विधानसभा निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला डिपॉजिट म्हणून १० हजार रुपये, तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५ हजार रुपये निवडणूक आयोगाकडे जमा करावे लागतात.
  • राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्व वर्गातील उमेदवारांना १५ हजार रुपयांचे डिपॉजिट जमा करावे लागते.

Assembly Election Results 2022 : मतमोजणीला सुरुवात! पाचही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मंदिरांमध्ये केली प्रार्थना

कोणत्या प्रसंगी डिपॉजिट जप्त होते?

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, जर एखाद्या उमेदवाराला एकूण मतदानाच्या १/६ म्हणजेच १६.६६% मते मिळवता आली नाहीत, तर त्याचे डिपॉजिट जप्त केले जाते. उदाहरणार्थ, एका जागेवर १ लाख मते पडली आणि उमेदवाराला १६,६६६ पेक्षा कमी मते पडली तर त्याचे डिपॉझिट जप्त होईल.

कोणत्या प्रसंगी डिपॉजिट परत केले जाते?

ज्या उमेदवाराला १/६ पेक्षा जास्त मते मिळतात त्यांचे डिपॉजिट परत केले जाते. जर उमेदवार निवडून आला असेल, परंतु त्याला १/६ पेक्षाही कमी मते मिळाली असतील, तरीही त्याला डिपॉजिट रक्कम परत केली जाते. याशिवाय मतदान सुरू होण्यापूर्वी कोणत्याही उमेदवाराचा मृत्यू झाल्यास, ज्या उमेदवारांचे नामांकन रद्द झाले आहे किंवा ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे अशा सर्व उमेदवारांची डिपॉजिट रक्कमही परत केली जाते.

Story img Loader