विचारशक्ती, नवनिर्मितीक्षमता आणि आत्मविश्वास या तिन्ही गोष्टींच्या जोरावर व्यक्ती अफलातून असे काही निर्माण करू शकतो, याची प्रचिती सध्या काही आविष्कारांमधून पुढे आलेली आहे. आज आपण ट्रेडमिलसंबंधी भन्नाट संकल्पनांबाबत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात काही व्यक्तींनी ट्रेडमिलसोबत अनोखे प्रयोग केले आहे. कुठे ट्रेडमिल सारख्या मशिनीवर बैलांना चालवून उर्जानिर्मिती केली जात आहे, शेताचे सिंचन होत आहे. तर कुठे लाकडापासून ट्रेडमिल बनवली आहे. ही ट्रेडमिल विजेशिवाय चालते. ही ट्रेडमिल आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार असून ती विक्रीला आल्यास तिची किंमत देखील स्वस्त असण्याची शक्यता आहे.

(मेहंदीवाले नही मेहनतवाले हात.. टाटाच्या ‘या’ दमदार वाहनांच्या निर्मितीमागे १५०० महिलांची मेहनत, व्हिडिओ पाहून वाटेल अभिमान)

ट्रेडमिल आणि बैलांच्या सहाय्याने वीज निर्मिती

एका व्हिडिओमध्ये बैलांचा वापर करून वीज निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी वापरण्यात आलेले साधन पाहून तुम्ही चकित व्हाल. हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल होत आहे. आयएएस अधिकारी अवानिश शरण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका बैलगाडीवर ट्रेडमिल सारखे उपकरण दिसून येत आहे. त्यावर एक बैल चालत आहे. ट्रेडमिलवर सारख्या मशिनीवर बैल चालताच पाणी शेतात फेकल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

व्हिडिओत पुढे अनेक बैल ट्रेडमिल सारख्या उपकरणांवर चालत असून त्याद्वारे वीज निर्मिती होऊन बल्ब उजळल्याचे दिसून येते. ही कल्पना भन्नाट आहे. काही त्याचे कौतुक करत आहे, मात्र काहींना हा प्रकार प्राण्यांना त्रासदायी होत असल्याचे वाटत असून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लाकडी ट्रेडमिल

चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम आणि शरीराची हालचाल होणे गरजेचे आहे. यासाठी लोक जिम लावतात, ट्रेडमिलवर धावतात. मात्र अनेकांना हे परवडते असे नाही. या पार्श्वभूमीवर तेलंगणातील एका व्यक्तीने आपल्या कल्पकतेच्या जोरावर एक लाकडी ट्रेडमिल बनवली आहे. या व्यक्तीच्या आविष्काराने अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने बनवलेल्या लाकडी ट्रेडमिलचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

अरुण भागावाथुला यांनी या ट्रेडमिलचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तुम्हाला लाकडी ट्रेडमिल काम करताना दिसून येईल. त्यावर एक व्यक्ती चालत असून लाकडी ट्रेडमिल इलेक्ट्रिक ट्रेडमिलसारखीच कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तिला इलेक्ट्रिक ट्रेडमिल सारखे फीचर जरी नसले तरी घरीच वॉक करायला ही मशीन फायदेशीर ठरू शकते. चालल्याने आरोग्य चांगले राहाते. ही लाकडी मशीन यासाठी उपयोगी पडू शकते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity from bullocks on treadmill like machine ssb
First published on: 25-09-2022 at 13:26 IST