scorecardresearch

Premium

Video: फोटो काढायला हत्तीच्या जवळ गेला, चवातळलेल्या हत्तीने तरुणाला भयंकर इंगा दाखवला

Viral video: प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

elephant attack on man while taking photo
फोटो काढताना चवताळला हत्ती

आपण जंगली सफारीला गेला असाल तर वाघ, हत्ती यांसारखे जंगली प्राणी पाहिले असतील.सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. व्हायरल होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात.काही व्हिडीओ घाबरवणारे असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात.सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलाय आणि शेअरसुद्धा केला आहे. मात्र, प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला जंगलात एक हत्ती दिसतो. तो रागात आहे. मोठमोठ्याने ओरडून तो कुणाचा तरी पाठलाग करत आहे. इतक्यात हत्तीच्या पुढे एक व्यक्ती पळताना दिसते. हत्तीपासून जीव वाचण्यासाठी ही व्यक्ती पळते खरी पण तिचा तोल जातो आणि ती धाडकन खाली कोसळते. तेव्हा हत्ती तिच्या मागेच असतो. पण सुदैवाने ती व्यक्ती कशी बशी स्वतःला सावरत उठते. व्यक्ती जंगलातून रोडवरील येते. तेव्हा सफारी गाडी तिथे येते, हत्ती हल्ला करत असलेल्या व्यक्तीला पाहून ती गाडी थांबते.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कोल्हापूरकरांचा नादखुळा! लाखोंचा खर्च करत गाईचं डोहाळे जेवण, नेटकरी म्हणतात हौसेला मोल नाही

गाडीतील सर्वजण दृश्य पाहून घाबरतात आणि आरडाओरडा करू लागतात. त्या व्यक्तीला गाडीत बसण्यासाठी बोलवतात. व्यक्ती धावत येते आणि त्या गाडीत बसते. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी अनेक प्रतिक्रिया यावर देत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 11:09 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×