shocking viral video: कर्नाटकातील प्रसिद्ध कुक्के श्री सुब्रमण्य मंदिरात नुकताच घडलेला एक अनोखा प्रसंग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पवित्र तीर्थस्थानी अनुष्ठान सुरू असताना अचानक घडलेल्या या घटनेने भक्त आणि पाहणाऱ्यांना क्षणभर धक्काच बसला.मंदिरात सेवा करणाऱ्या एका प्रशिक्षित हत्तीने एका पोलिस अधिकाऱ्याला धार्मिक विधीदरम्यान जवळ येताच त्याच्या सोंडेने हलक्याने धक्का देऊन मागे ढकलले.

हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये दिसते की, मंदिरात रोजच्याप्रमाणे तीर्थस्थानी सोहळा सुरू होता, यावेळी भक्तांना पवित्र जल देण्याचा विधी सुरू असतो. परिसरात मोठी गर्दी असल्याने पोलिस कर्मचारी गर्दी सांभाळण्यासाठी तिथे उभे असतात. त्याचवेळी एक पोलिस कर्मचारी चुकून विधीच्या अगदी जवळ येतो आणि इथेच ही घटना घडते.

व्हिडीओमध्ये मंदिरात जिथे विधी चालू असतो त्याच्याच शेजारी एक हत्ती उभा असल्याचे दाखवले आहे. पोलिसाने न कळत समारंभात प्रवेश करताच, हत्तीने त्याच्या सोंडेने पोलिसाची मान आणि खांदे हळूवारपणे धरले आणि त्याला मागे ढकलले. हे इतके लवकर घडले की तिथे उपस्थित लोक क्षणभर थक्क झाले.

पाहा व्हिडिओ

सुरुवातीला धक्का बसला असला तरी लगेचच सर्वांनी पाहिले की हत्तीचे नुकसान करण्याचा अजिबात हेतू नव्हता, तो फक्त लोकांना थांबवण्यासाठी प्रतिक्रिया देत होता. पोलिसाला हलकासा धक्का बसला, पण तो लगेच ठीक झाला. मंदिर प्रशासनानुसार हा हत्ती अनेक वर्षांपासून मंदिरात सेवेत आहे आणि अनुष्ठानांचे शिस्तबद्ध नियम त्याला चांगले माहीत आहेत, त्यामुळे पवित्र विधी चालू असताना कोणीही मध्ये येत असल्यास तो त्याला दूर करतो.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ infovia.in या इन्स्टाग्नाम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी लिहिलं, “हा खरा पवित्रतेचा रखवालदार!” बरेच जण म्हणाले, “हत्तीला माहिती आहे की पवित्र विधीमध्ये अडथळा येऊ नये.”

काहींनी पोलिस जवानावर हलकीशी खिल्ली उडवत म्हटलं, साहेब हत्तीचा नियम पाळा, नाहीतर तो पाळायला लावेल!” तर काही भक्तांनी हा प्रकार आस्था, अनुशासन आणि परंपरेचा सुंदर धडा म्हणून पाहिला. लोकांनी हेही म्हटलं की, प्राणी अनेकदा वातावरणातील पवित्रता आणि भावनांची जाणीव माणसांपेक्षा जास्त करतात, त्यामुळे हत्तीची ही प्रतिक्रिया नैसर्गिक आणि योग्य होती असंच सर्वांचं मत आहे.