हत्तीने गणपती मंदिरात येऊन बाप्पाची पूजा केली! व्हिडीओ होतोय व्हायरल

गणपती मंदिरात आरती सुरू असताना अचानक हत्ती मंदिरात आला आणि गणपतीचा आशिर्वाद घेत पूजा सुद्धा केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

elephant-bowing-head-in-lord-ganesha-temple
(Photo: Twitter/Vertigo_Warrior)

सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू असून प्रत्येकजण बाप्पाच्या सेवेत मग्न आहे. गणरायाच्या भक्तीत सगळेचजण रमलेले आहेत. साक्षात गणेशाचं रूप मानला जाणारा हत्तीसुद्धा गणरायाच्या भक्तीत रमलाय. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. गणपती मंदिरात आरती सुरू असताना अचानक हत्ती मंदिरात आला आणि गणपतीचा आशिर्वाद घेत पूजा सुद्धा केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

माणसं जशी सहजपणे मंदिरात येऊन बाप्पाचं दर्शन घेतात अगदी तशाच पध्दतीने एका हत्तीने गणपती मंदिरात आरती सुरू असताना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. त्यानंतर आपल्या पायांवर बसत बाप्पाच्या आरतीमध्ये सहभागी झाला. इतकंच नव्हे तर त्याने आपल्या सोंडेच्या माध्यमातून गणपती बाप्पाला नमस्कार घातला. आपली सोंड वर करत त्याने गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेतला. ही घटना मंदिरात असलेल्या नागरिकांनी मोबाईल मध्ये कैद केली. नागरिकांना देखील मंदिरात घडलेला हा प्रकार आश्चर्यकारक वाटतो आहे. या व्हिडीओला लोकांची चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ पाहू शकता.

आणखी वाचा : लाडक्या गणरायासमोर एसीपीही बेभान होऊन नाचतात तेव्हा…; व्हिडीओ व्हायरल!

आणखी वाचा : जमिनीवर झोपलेल्या मुलीच्या गळ्याशी विळखा टाकून बसला होता नाग! दोन तास हलला देखील नाही

अनेकांसाठी ही घटना आश्चर्यचा धक्का देणारीच होती. पण गणपती मंदिरात हत्तीने घेतलेलं हे दर्शन पाहून अनेकजण वेगवेगळे अर्थ लावत आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास ३५ हजाराहून अधिक लोकांनी पाहिलाय. त्याचप्रमाणे या व्हिडीओवर गणेशभक्त जय-जयकार करत कमेंट्स करताना दिसून येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Elephant bowing head in lord ganesha temple ganesh chaturthi prp