तुम्ही आजपर्यंत एखाद्या कुत्र्याला चोरांना किंवा ड्रग्ज पकडताना पाहिलं असेल यात शंका नाही, पण तुम्ही कधी एखाद्या हत्तीला ड्रग्ज पकडताना पाहिलं आहे का? नसेल तर तुम्हाला आज ते देखील बघायला मिळणार आहे. हो कारण सध्या सोशल मीडियावर एका आशियाई हत्तीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण या हत्तीने २.८ किलो ड्रग्ज शोधून काढले आहे. हे प्रकरण दक्षिण चीनमधील युनान प्रांतामधील आहे. हत्तीने केलेल्या या कामगिरीचे नेटकरी आता खूप कौतक करत असल्याचही पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला चार हत्ती एका जंगतालातून जाताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यातील एक हत्ती अचानक थांबतो. यावेळी त्याला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांमध्ये एक बॅग पडलेली दिसते, यावेळी हत्ती त्या बॅगजवळ जातो आणि आपल्या सोंडेने ती उचलतो आणि मागे फेकतो.
व्हिडीओत पुढे दिसत आहे की, हत्तीने फेकलेली बॅग नंतर पोलिसांच्या हाती लागते, जे तिथे आधीच उपस्थित होते. पोलिसांनी त्या पिशवीचा वास घेतात आणि हत्ती तेथून जाण्याची वाट पाहत थांबतात. हत्ती निघून गेल्यानंतर पोलीस त्या बॅगजवळ येतात आणि बॅगमधील सामान बाहेर काढतात. पोलीस बॅगमधून काय काय सामान काढतात ते व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांना कपड्याच्या खाली घट्ट बांधलेली ड्रग्ज वीट सापडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तर सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तर सोशल मीडियावर ड्रग्जची बॅग शोधणाऱ्या हत्तीचे नेटकरी खूप कौतुक करत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
हत्तीच्या या व्हिडिओवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तर अनेकजण हत्ती या पृथ्वीवरील सर्वात प्रतिभावान प्राणी असल्याचं म्हणत आहे. तर हत्तीच्या या उत्तम कामगिरीचा व्हिडिओ ट्विटरवर वॉच टॉवर नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
