scorecardresearch

Video: चार जणांचं कुटुंब प्रवास करत असणाऱ्या कारला हत्तीची धडक; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

हा संपूर्ण घटनाक्रम रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुसऱ्या एका गाडीमधील व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला.

Elephant Flips Over Car
हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय

हत्ती हा तसा शांत प्राणी आहे. मात्र तो संतापल्यानंतर त्याला आवरणं कठीण असतं. सांतपलेला हत्ती हा फार धोकादायक असतो. अनेकदा अशाप्रकारे हत्तींनी केलेल्या हल्ल्यांमध्ये लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्यात. असाच एक धक्कादाय व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरुन समोर आलाय. या व्हिडीओमध्ये हत्तीने एका कारवर केलेल्या हल्ल्याचे धक्कादायक क्षण रेकॉर्ड झालेत. एका गाडीमधून एक कुटुंब प्रवास करत असतानाच हत्ती या गाडीला धडक देतो आणि गाडी उलटी करतो. हा हत्ती धडक देत गाडी अगदी रस्त्यावरुन खाली ढकलून देताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओमधील घटना ही दक्षिण आफ्रिकेमधील क्वाझुलू-नाता प्रांतातील सिमांगालीसो वेटलॅण्ड पार्कमध्ये घडलीय. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार या हत्तीने गाडीला धडक दिली आणि त्यानंतर गाडी ढकलत ढकलत रस्त्याखाली नेली तेव्हा गाडीमधून चार जणांचं एक कुटुंब प्रवास करत होतं. यात दोन लहान मुलं आणि त्यांच्या पालकांचा समावेश होता, असं वृत्तात म्हटलंय.

रस्त्यावर हा सारा प्रकार घडत असताना मागून येणाऱ्या गाडीमधील व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये घटनाक्रम कैद केलाय. या व्हिडीओत हत्ती फोर्डच्या एक्सयुव्हीला अगदी सहजपणे धडक देत रस्त्यावरुन खाली ढकलत असल्याचं दिसतंय.

नक्की वाचा >> शिकारीचा ‘हा’ ५७ सेकंदांचा Video पाहून आव्हाडही झाले थक्क; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “Amazing Hunting”

व्हिडीओच्या सुरुवातीला हत्ती गाडीला धडक देतो तेव्हा गाडी थांबताना दिसते. नंतर हत्ती निघून जाईल या अपेक्षेने गाडी जागची हलत नाही. मात्र हत्ती त्यानंतर गाडीला अजून जोरात धडक देत ती उलटी पाडतो. त्यानंतरही समाधान न झाल्याने हत्ती तिला अगदी रोडच्या खाली ढकलून देतो. थोडा वेळ तिथे थांबल्यानंतर हत्ती निघून जातो. त्यानंतर रस्त्यावरील गाड्यांमधील इतर लोक या गाडीतील चार जणांना बाहेर काढलं.

नक्की वाचा >> प्रेयसीच्या आईचा जीव वाचवण्यासाठी त्याने दान केली किडनी; महिन्याभरानंतर प्रेयसीने दुसऱ्यासोबतच केलं लग्न

यासंदर्भात पार्कने जारी केलेल्या पत्रकामध्ये हत्तीने सोंडेने गाडीला धडक दिली आणि नंतर प्रवासी गाडीमध्ये असतानाच ती धडक देत पलटवली, असं म्हटलंय.

नक्की पाहा >> एक झडप अन् टप्प्यात कार्यक्रम…; ९४ लाख Views असणारा सिंहिणींच्या ‘टीम वर्क’चा हा Video पाहिलात का?

“रविवारी आम्हाला या घटनेसंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर मदतकार्य करणारी टीम तातडीने घटनास्थळी पोहचली. या घटनेमध्ये गाडीमधील कुटुंबाची सुखरुप सुटका करण्यात आलीय,” असंही पार्कने स्पष्ट केलं. सामान्यपणे अशापद्धतीच्या घटना पार्कमध्ये होत नाहीत. मात्र आता या पुढे अशा घटनांना तोंड देण्यासंदर्भातील व्यवस्थापन अधिक नियोजतपद्धतीने आखण्यात येईल असं पार्कने म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Elephant flips over car while a family was still inside in viral video scsg

ताज्या बातम्या