scorecardresearch

VIRAL VIDEO : चक्क हत्तीने एका महिलेसोबत केला प्रॅंक, तिची टोपीच गायब केली

हत्ती हा तसा सहसा कुणालाही विनाकारण त्रास न देणारा प्राणी आहे. मात्र चक्क हत्तीने एका महिलेसोबत प्रॅंक केलाय. होय, हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हत्तीसारखा प्राणी प्रॅंक कसा काय करेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खूपच मजेदार आहे.

Elephant-Prank-Video-Viral
(Photo: Instagram/ wildtrails.in)

हत्ती हा तसा सहसा कुणालाही विनाकारण त्रास न देणारा प्राणी आहे. मात्र चक्क हत्तीने एका महिलेसोबत प्रॅंक केलाय. होय, हे ऐकून सुरूवातीला तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हत्तीसारखा प्राणी प्रॅंक कसा काय करेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा व्हिडीओ पाहण्यासाठी खूपच मजेदार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हत्ती एका महिलेसोबत मस्ती करताना दिसून येत आहे. ती महिला या हत्तीसोबत फोटो काढण्यासाठी त्याच्यासमोर उभी राहून पोज देताना दिसून येतेय. अचानक पुढे हत्ती या महिला सोबत जे करतो ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. हत्ती या महिलेच्या डोक्यावरची टोपी आपल्या सोंडेने उचलतो आणि सर्वांना बुचकळ्यात पाडतो.

महिलेसोबत चेष्टा करताना हत्ती त्याच्या सोंडेने महिलेची टोपी उचलतो आणि तोंडात लपवतो. यानंतर हत्ती गप्प राहतो. त्यानंतर महिला तिच्या डोक्यावरची टोपी शोधू लागते. पण त्या महिलेला तिची टोपी दिसत नाही.

आणखी वाचा : आश्चर्य! लग्नात नवरीचा मुलगा अचानक आला समोर, मग काय झालं पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पाठवणीच्या वेळी नवरीऐवजी नवरदेवच ढसाढसा रडला, पाहा हा VIRAL VIDEO

यानंतर जेव्हा महिलेने हत्तीकडे पाहिले तेव्हा काही वेळातच हत्तीने महिलेला त्याने घेतलेली टोपी दिलेली दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया यूजर्सही या व्हिडीओवर लागोपाठ आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Elephant pranks woman made her cap disappear prp

ताज्या बातम्या