scorecardresearch

पिल्लाला वाचवण्यासाठी या हत्तींनी लढवली अनोखी शक्कल; Viral Video एकदा पाहाच

रस्ता ओलांडताना पिल्लाला वाचवण्यासाठी या दोन हत्तींनी केलेली युक्ती नेटकऱ्यांना भावली आहे, हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

पिल्लाला वाचवण्यासाठी या हत्तींनी लढवली अनोखी शक्कल; Viral Video एकदा पाहाच
Photo : Social Media

सर्व पालकांचे त्यांच्या मुलांवर प्रचंड प्रेम असते. प्राण्यांमध्ये देखील हे प्रेम आपल्याला पाहायला मिळते. प्राण्यांचे त्यांच्या पिल्लांबरोबरचे अनेक गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन हत्ती त्यांच्या पिल्लासह रस्ता ओलांडताना दिसत आहेत. त्यांच्यासह रस्ता ओलांडणाऱ्या पिल्लाला रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांपासून वाचवण्यासाठी हे हत्ती अनोखी शक्कल लढवतात. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये दोन हत्ती त्यांच्या पिल्लासह रस्ता ओलांडताना दिसत आहेत. रस्ता ओलांडून झाल्यानंतर तिथून जाणाऱ्या बसला वाट मिळावी म्हणून हे हत्ती रस्त्याच्या इका बाजुला जातात. पण त्यांच्याबरोबर असणारे पिल्लू लहान असल्याने बससमोर जाण्याची शक्यता वाटते. त्या पिल्लाला वाचवण्यासाठी हे दोन हत्ती त्या पिल्लासमोर एकमेकांची सोंड अडकवून उभे राहतात, म्हणजे त्याचा पुढे जाण्याचा रस्ता बंद करतात. या हत्तींचे हे गोंडस कृत्य नेटकऱ्यांना भावले आहे. आतापर्यंत ३९ हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेक जणांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांची पसंती दर्शवली आहे. पाहूया हा हा व्हायरल व्हिडीओ आणि त्यावरील नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

आणखी वाचा : ऐकावे ते नवलच! घरात व्हिडीओ गेम खेळत असताना त्याच्या अंगावर पडली वीज अन्…

व्हायरल व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

आणखी वाचा : Viral Video : हत्तीला कधी डान्स करताना पाहिलंय? हा गोंडस व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

आणखी वाचा : काळ आला होता पण…; निष्काळजीपणामुळे काय होऊ शकते हे दाखवणारा Viral Video एकदा पाहाच

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या