scorecardresearch

“ट्विटर वापरण्याचा आजचा शेवटचा दिवस” एलॉन मस्कने शेअर केलेला सेक्सी फोटो पाहून नेटकरी संतापले

ट्विटमध्ये दोन मुली दिसत आहेत. त्यातील एक मुलगी दुसऱ्या मुलीवर जबरदस्ती करताना दिसत आहे

elon musk shared a sexy photo
एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन असा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून नेटकऱ्यांनू संताप व्यक्त केला आहे. (Photo : Twitter, wikipedia)

एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचा मालकी हक्क मिळवल्यापासून या कंपनीत अनेक बदल झाले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा बदल म्हणजे ट्विटरचं सर्वात मोठं आकर्षण असणाऱ्या ब्लू टिकचा. अनेकांना हवीहवीशी वाटणारी ब्लू टिक एलॉन मस्क यांनी कंपनीची सुत्र हातात घेताच ती पैसे देऊन ती कुणीही विकत घेऊ शकतो, अशी पद्धत सुरु केली. ज्यामुळे अनेक युजर्स नाराज झाले आहेत. तेव्हापासून मस्क हे असेच युजर्संना वेगवेगळे धक्के देत असतात.

अशातच आता त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन असा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून नेटकऱ्यांनू संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांनी आम्ही आता खरंच ट्विटर वापरणं सोडून देणारं असल्याचं म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेलं ट्विट आहे तरी काय आणि नेटकऱ्यांनी त्यावर काय कमेंट केलेत त्या पाहूया.

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते सतत कंपनीबाबतच्या नवीन अपडेट ट्विटच्या माध्यमातून देत असतात. तसंच ते मीम्सच्या माध्यमातूनही लोकांना काही मेसेज देण्याचा प्रयत्न करतात. अशातच आता त्यांनी मीम म्हणून असा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

हेही वाचा- १०० रुपयांहून स्वस्त झाली महागडी ब्रँडेड दारू? भारतातील ‘या’ कॅन्टीनचे दरपत्रक पाहून व्हाल थक्क

या ट्विटमध्ये दोन मुली दिसत आहेत. यामध्ये एक मुलगी दुसऱ्या मुलीला जबरदस्तीने दूध पाजत आहे. यामध्ये एका मुलीवर ‘ट्विट्स ऑफ इलॉन मस्क’ लिहिलेले आहे, तर दुसऱ्या मुलीवर ‘ट्विटर’ असे लिहिले आहे. या फोटोमधून मस्क यांनी वापरकर्त्यांना काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु लोकांनी या मीम्सचे अनेक वेगवेगळे अर्थ काढले असून त्यांनी त्याबाबतच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत.

हेही वाचा- ‘प्रेमळ’ ChatGpt! आता लव्हगुरुंची होणार गच्छन्ती? चॅटजीपीटीनं लिहिलेलं लव्हलेटर व्हायरल!

एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, ‘तुम्ही आम्हाला बळजबरीने खायला देत आहात आणि आम्ही त्यावर खूश नाही.’ तर दुसर्‍याने ‘महिलेला एलॉनचे लेबल लावायला हवं आणि दुधाची बाटली एलॉनचे ट्विट म्हणून दाखवायला हवी होती.’ लिहिलं आहे. तर तिसऱ्याने म्हटलं आहे, ‘एलॉनने कंपनी विकत घेतल्यापासून ट्विटर अधिक चांगले झाले आहे.’

तर आणखी एकाने, ‘हे नक्की आहे की, मी आता ट्विटर वापरणार नाही. २००६ पासून मी एक निष्ठावंत समर्थक आहे आणि ही शेवटची वेळ आहे. एलॉनने या अॅपला आपत्तीत रूपांतरित केले आहे आणि ते आणखी वाईट होत आहे. आज रात्री मी ट्विटर डिएक्टीवेट करत असून माझे टॅलेंट इंस्टाग्रामवर घेऊन जात आहे, जिथे तो एक उत्तम अॅप चालवत आहे.’ तर अनेकांनी ट्विटर आता अश्लील झालं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मस्क यांच्या या फोटोमुळे अनेक ट्विटर वापरकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 10:22 IST