Elon Musk Child Name Is Indian: इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांची यूकेमध्ये एआय सेफ्टी समिटच्या उद्घाटनादरम्यान भेट घेतली. मस्क संचालित टेस्ला आणि स्टारलिंक इंटरनेट सेवा भारताच्या बाजारपेठेत प्रवेश करू पाहत असताना ही बैठक झाली. या बैठकीत मस्क यांनी राजीव चंद्रशेखर यांच्याशी बोलताना आपल्या मुलाच्या नावाविषयी खास उलगडा केला. यामुळे आश्चर्यचकित झालेल्या चंद्रशेखर यांनी X (पूर्व ट्विटर) वर एक खास पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.
मस्क यांनी राजीव यांना सांगितले की त्यांच्या मुलाचे मधले नाव देखील चंद्रशेखर आहे. शिवॉन झिलिस व एलॉन मस्क यांच्या मुलाचे नाव हे प्रोफेसर सुभ्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरून ठेवलेले आहे. १९८३ मध्ये प्राध्यापक एस चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर यांनी परिधान केलेल्या पोषाखाने सुद्धा भारतीयांचे मन जिंकले आहे. चंद्रशेखर या कार्यक्रमासाठी पारंपरिक वेष्टी नेसून पोहोचले होते.
राजीव चंद्रशेखर व मस्कची गाठभेट
हे ही वाचा<< म्हाडा लॉटरीसाठी एजंटची मदत घेण्याआधी हे वाचाच! १४ वर्ष मनस्ताप सहन केलाच वर मागितले ३५ लाख
दरम्यान, यूकेमधील पहिल्या-वहिल्या ‘एआय सेफ्टी समिट’ला संबोधित करताना राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की एक नवीन फ्रेमवर्क तयार करणे आवश्यक आहे, जिथे इंटरनेट एक माध्यम म्हणून वापरकर्त्यांसाठी आणखी सुरक्षित सिद्ध होऊ शकेल. AI असो किंवा पूर्ण इंटरनेट ही संकल्पनाच असो वापरकर्त्यांचा विश्वास कमवणे व त्यांना सुरक्षित वाटेल याची सुनिश्चीती करणे ही माध्यमाची जबाबदारी आहे.”