बहुतेक सर्वच क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी वयाची अट घालून दिलेली असते. काही ठिकाणी ही अट ६० वर्षे असते तर काही ठिकाणी ती ६५ वर्षे असते. पण राजकारणात मात्र वयाची अट नेत्यांना घातली जात नाही. राजकारण हे एका अर्थाने समाजकारण असल्याचं सांगत राजकीय नेत्यांना निवडणुका लढवण्यासाठी वयाची अट नाकारली जाते. मात्र, आता एलॉन मस्कला राजकारण्यांना वयाची अट घालायला हवी, असं वाटू लागलं आहे. यासंदर्भात एलन मस्कने गुरुवारी केलेलं ट्वीट तुफान व्हायरल झालं असून त्यावर आत्तापर्यंत हजारो रीट्वीट्स आणि कमेंट्स आल्या आहेत. साडेतीन लाखाहून जास्त नेटिझन्सनी हे ट्वीट लाईक देखील केलं आहे!

पराग अग्रवालांबाबत केलेलं ट्वीटही व्हायरल!

टेस्लाचे प्रमुख असलेला एलॉन मस्क याने बुधवारी ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांच्याबाबत केलेल्या ट्वीटवरून अशीच जोरदार चर्चा सुरू झाली होती. मस्कने पराग अग्रवाल यांचं फोटोशॉप केलेलं एक मीम शेअर केलं होतं. यात सोविएत संघाचा हुकुमशाहा जोसेफ स्टॅलिन याच्या चेहऱ्याच्या जागी पराग अग्रवाल यांचा चेहरा तर त्याचा सहाय्यक निकोलाय येजहोवच्या जागी जॅक डॉर्सीचा चेहरा लावलेला आहे. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, स्टॅलिनविरोधात कट रचण्याच्या आरोपावरुन येजहोव यांची हत्या करण्यात आली होती. पराग अग्रवाल यांची सीईओपदी नियुक्ती होण्याच्या आधीच जॅक डर्सी यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता. त्याचसंदर्भात या ट्वीटची जोरदार चर्चा नेटिझन्समध्ये रंगली होती.

त्यानंतर गुरुवारी एलॉन मस्कने राजकीय नेत्यांना निवडणुका लढवण्यासाठी वयाची अट घालण्यासंदर्भात ट्वीट केलं. या ट्वीटवरून देखील मोठी चर्चा सुरू झाली असून नेटिझन्सकडून राजकीय नेत्यांसाठी वयाची अट घालण्याचं समर्थन करण्यात येत आहे.

३०० बिलियन डॉलर्सचा मालक एलन मस्क कधीकाळी झाला होता निराश; आनंद महिंद्रांनी केलं ‘ते’ ट्वीट शेअर, म्हणाले…!

वयाची अट ७० वर्षे असावी?

“निवडणुका लढवण्यासाठी वयोमर्यादा असायला हवी. कदाचित तो आकडा ७० वर्षांच्या काहीसा खाली असू शकेल”, असं ट्वीट एलॉन मस्कने केलं आहे.

त्याच्या या ट्वीटनंतर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काही नेटिझन्सली चांगल्या दर्जाची लोकं राजकारणाकडे येण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सांगितलं.

तर काहींनी राजकारणातील समज कदाचित ३५ वयाच्या व्यक्तीपेक्षा ७० वर्षांच्या व्यक्तीमध्ये जास्त असू शकेल, असं देखील म्हटलं आहे.