फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून सुरु असणाऱ्या युद्धामध्ये पुन्हा एकदा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अशातच टेस्लाचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या इलॉन मस्क यांनी एक ट्वीट केलं आहे. युक्रेन आणि रशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातील एक ट्वीटर पोल मस्क यांनी पोस्ट केला आहे. मात्र आपले मुद्दे मांडताना त्यांनी युक्रेनसंर्भात केलेल्या विधानांवरुन युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने थेट ट्वीटरवरुन आक्षेपार्ह शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झालं असं की मस्क यांनी ट्वीटरवरुन युक्रेन आणि रशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तीन मुद्दे मांडले. यामध्ये त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये ज्या प्रांतावरुन वाद सुरु आहे त्या प्रांतामध्ये निवडणूक घेण्याचा सल्ला दिला. तसेच जर तेथील लोकांना रशियाविरोधात मतदान केलं तर रशियाने तिथून काढता पाय घ्यावा असा सल्ला मस्क यांनी दिला आहे. मस्क यांनी क्रिमिया हा पूर्वीपासून रशियाचा भाग असल्याचा दावा केला आहे. इतकचं नाही तर क्रिमियाला पाणी पुरवठा करुन युक्रेनने यासंदर्भात तटस्थ राहावं असे मुद्दे मांडत यावर मस्क यांनी हो किंवा नाही असे पर्याय देऊन लोकांची मतं मागवली आहेत. मस्क यांची पोस्ट काय आहे ते पाहूयात…

युक्रेन-रशिया शांतता –

– संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली वादग्रस्त प्रांतामध्ये निवडणूक घ्या. लोकांना वाटत असेल तर रशियाने तिथून माघार घ्यावी.
– क्रिमिया हा पूर्वीपासून रशियाचा भाग आहे. तो अगदी १७८३ पासून रशियाचा प्रांत आहे. (ख्रुश्चेव्ह यांनी चूक करेपर्यंत.)
– क्रिमियाला पाणी पुरवठा करावा. युक्रेनने यामध्ये तटस्थ रहावं.

हे ट्वीट ३६ हजारांहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटवर युक्रेनचे शासकीय अधिकारी असणाऱ्या अँड्रिज मेल्नीक यांनी थेट मस्क यांना टॅग करुन थेट शिवी दिली आहे. “यावर माझा अगदी डिप्लोमॅटिक रिप्लाय ‘फ* ऑफ’ असा आहे,” असं अँड्रिज मेल्नीक यांनी रिप्लायमध्ये म्हटलं आहे.

अँड्रिज मेल्नीक याचं हे ट्वीट १६ हजार ७०० हून अधिक जणांनी रिट्वीट केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk tweets his peace plan to end ukraine war scsg
First published on: 04-10-2022 at 12:12 IST