जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मस्क यांनी सांगितला युक्रेन-रशिया युद्धावरील शांतता मार्ग; युक्रेनकडून रिप्लाय आला, "F**k..." | Elon Musk Tweets His Peace Plan To End Ukraine War scsg 91 | Loksatta

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मस्क यांनी सांगितला युक्रेन-रशिया युद्धावरील शांतता मार्ग; युक्रेनकडून रिप्लाय आला, “F**k…”

मस्क यांनी केलेलं ट्वीट ३६ हजारांहून अधिक जणांनी रिट्वीट केलं आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मस्क यांनी सांगितला युक्रेन-रशिया युद्धावरील शांतता मार्ग; युक्रेनकडून रिप्लाय आला, “F**k…”

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून सुरु असणाऱ्या युद्धामध्ये पुन्हा एकदा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अशातच टेस्लाचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या इलॉन मस्क यांनी एक ट्वीट केलं आहे. युक्रेन आणि रशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातील एक ट्वीटर पोल मस्क यांनी पोस्ट केला आहे. मात्र आपले मुद्दे मांडताना त्यांनी युक्रेनसंर्भात केलेल्या विधानांवरुन युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने थेट ट्वीटरवरुन आक्षेपार्ह शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.

झालं असं की मस्क यांनी ट्वीटरवरुन युक्रेन आणि रशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तीन मुद्दे मांडले. यामध्ये त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये ज्या प्रांतावरुन वाद सुरु आहे त्या प्रांतामध्ये निवडणूक घेण्याचा सल्ला दिला. तसेच जर तेथील लोकांना रशियाविरोधात मतदान केलं तर रशियाने तिथून काढता पाय घ्यावा असा सल्ला मस्क यांनी दिला आहे. मस्क यांनी क्रिमिया हा पूर्वीपासून रशियाचा भाग असल्याचा दावा केला आहे. इतकचं नाही तर क्रिमियाला पाणी पुरवठा करुन युक्रेनने यासंदर्भात तटस्थ राहावं असे मुद्दे मांडत यावर मस्क यांनी हो किंवा नाही असे पर्याय देऊन लोकांची मतं मागवली आहेत. मस्क यांची पोस्ट काय आहे ते पाहूयात…

युक्रेन-रशिया शांतता –

– संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली वादग्रस्त प्रांतामध्ये निवडणूक घ्या. लोकांना वाटत असेल तर रशियाने तिथून माघार घ्यावी.
– क्रिमिया हा पूर्वीपासून रशियाचा भाग आहे. तो अगदी १७८३ पासून रशियाचा प्रांत आहे. (ख्रुश्चेव्ह यांनी चूक करेपर्यंत.)
– क्रिमियाला पाणी पुरवठा करावा. युक्रेनने यामध्ये तटस्थ रहावं.

हे ट्वीट ३६ हजारांहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीटवर युक्रेनचे शासकीय अधिकारी असणाऱ्या अँड्रिज मेल्नीक यांनी थेट मस्क यांना टॅग करुन थेट शिवी दिली आहे. “यावर माझा अगदी डिप्लोमॅटिक रिप्लाय ‘फ* ऑफ’ असा आहे,” असं अँड्रिज मेल्नीक यांनी रिप्लायमध्ये म्हटलं आहे.

अँड्रिज मेल्नीक याचं हे ट्वीट १६ हजार ७०० हून अधिक जणांनी रिट्वीट केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Viral Video : गाय आणि वासराने पाणीपुरीवर मारला ताव; नेटकरी म्हणतात, “यांनी तर मुलींनाही…”

संबंधित बातम्या

Video: पर्यटकांना वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! वाघ अचानक उड्या मारत आला अन…
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
विश्लेषण: तीन घुमट, एक बस-स्टॉप आणि राजकीय खडाजंगी; म्हैसूरमधील बस स्थानकामुळे निर्माण झालेला वाद नेमका काय?
Shraddha Walkar Murder: श्रद्धाची अंगठी, केसांचे बुचके अन् गुजरात कनेक्शन; आफताबसंदर्भात नवे धक्कादायक खुलासे
VIDEO : भारतीय लष्कराला मिळाला ‘अर्जुन’, पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनची करणार ‘शिकार’

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली
“…तेव्हा नाही का वाटली लाज?”; उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी चक्क सादर केली कविता
सुजलेला चेहरा, अशक्तपणा अन्…; अभिनेत्री श्रुती हसनची अशी अवस्था का झाली? आजारपणातील फोटो शेअर करत म्हणाली…
“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!
Video: ‘बिग बॉस’च्या घरात जेवणावरुन वाद, अर्चनाने शिवच्या भरलेल्या ताटामधून चपाती उचलली अन्…; व्हिडीओ व्हायरल