मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट असा लौकिक असणाऱ्या ट्विटरने काही दिवसांपूर्वीच सगळ्या अकाऊंट्सच्या ब्लू टिक काढून टाकल्या होत्या. ट्वीटरवर ब्लू टीक मिळणं म्हणजे अकाऊंट व्हेरिफाईड असल्याची खूण. मात्र ही खूण गेल्यामुळे अनेकजण त्रासले होते. खुद्द अमिताभ बच्चन यांनीही याबाबत आपलं म्हणणं व्यक्त केलं होतं. शाहरुख खान, सलमान खान, काँग्रेस नेते राहुल गांधी या आणि अशा अनेक अकाऊंटवरून ब्लू टिक गेली होती. पण आता अनेकांनी पैसे न देताच ही ब्लू टिक परत आली आहे. कोणत्या अकाऊंटवर परत आली ब्लू टिक? आपला लाडका सचिन तेंडुलकर याच्या अकाऊंटची ब्लू टिक हटवण्यात आली होती, ही ब्लू टिक परत आली आहे. तसंच विराट कोहली आणि इतर काही महत्त्वाच्या दिग्गजांचेही ब्लू टिक परत आले आहेत. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या ट्वीटरवरही ब्लू टिक दिसू लागली आहे. नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाईच्या अकाऊंटवरही ब्लू टिक आली आहे. त्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला आहे. ट्विटरवर अशा अनेक सेलिब्रिटींच्या अकाऊंटवर ब्लू टिक परत आली आहे. ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन न घेतल्यामुळे कारवाई! मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने प्रतिष्ठित लोकांच्या खात्यावरील ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली होती. यामध्ये अभिनेता, अभिनेत्री, खेळाडू, पत्रकार, राजकारणी यांचाही समावेश आहे. यामध्ये भारत सरकारच्या काही शासकीय विभागांच्या खात्यांचाही समावेश आहे. ट्विटर ब्लूसाठी पैसे न भरल्यामुळे या खात्यांसमोरील ब्लू टिक हटवण्यात आली आहे. असे असले तरी अगोदरपासून काही ट्विटर खात्यांना गोल्डन, ग्रे (राखाडी) रंगाचे व्हेरिफेकशन बॅच देण्यात आले आहेत. ट्विटरच्या या निर्णयाचा काय परिणाम झाला? ट्विटरने ब्लू टिक काढून टाकण्याच्या निर्णयानंतर जगातील अनेक प्रसिद्ध लोकांची ट्विटर खाती सर्वसामान्य लोकांसारखीच झाली आहेत. डीडब्ल्यूने दिलेल्या वृत्तानुसार एलॉन मस्क यांनी हा निर्णय घेण्याअगोदर जगभरात साधारण तीन लाख लोकांच्या खात्यावर ब्लू टिक होते. मात्र गुरुवारपासून ब्लू टिक काढून घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर पॉपस्टार बियोन्स, शकिरा, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, रियालिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (ते सध्या ट्विटरवर सक्रिय नाहीत.) अशा अनेक दिग्गज व्यक्तींच्या ट्विटर खात्यावरील ब्लू टिक हटवण्यात आली