पुण्यात केली एलॉन मस्कची पूजा. (Photo : Instagram)
सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या वैवाहिक बलात्कार जनहित याचिकेविरोधात पुरुषांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं पुण्यात उपोषण सुरू आहे. पण हे आंदोलन सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे, त्याचं कारण म्हणजे या उपोषणादरम्यान, काही लोकांनी एलॉन मस्क यांची पूजा केल्यामुळे. सध्या या आंदोलनातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
वैवाहिक बलात्कार जनहित याचिकेचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेल्या पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांच्या फोटोची आरती केली. शिवाय ही आरती आम्ही का केली हे सांगाताना आंदोलक म्हणाले, “आम्हाला दोष दिला जातो आणि स्त्रिया आमच्याविरुद्ध खोट्या तक्रारी नोंदवतात पण ट्विटर हे एकमेव ठिकाण आहे जिथे आम्ही मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो, म्हणून आम्ही एलॉन मस्कची पूजा करतो आणि त्यांचे आभार मानतो,”
पुण्यात सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशनतर्फे एक चळवळ चालवली जात आहे. यामध्ये ‘जबरदस्तीने लग्न करणे म्हणजे वैवाहिक बलात्कार’ या मोहिमेअंतर्गत लोकांना एकत्र करून देशभरात जनजागृती केली जात आहे. सध्या असंच एक उपोषण पुण्यात सुरु आहे. या उपोषनादरम्यान काही घोषणा दिल्या जात आहेत. त्यामध्ये “पुरुषांचा आदर करा, पुरुष देखील माणूस आहे”. यासोबतच ‘मर्द को भी दर्द होता है’, ‘फेमिनिझम इज कॅन्सर’ अशा घोषणा आंदोलनात दिल्या जात आहेत.
सेव्ह इंडियन फॅमिली फाऊंडेशनच्या ट्विटर हँडलवरती लिहिलं आहे की, भारतात दरवर्षी अंदाजे ४ लाख जबरदस्तीने विवाह होतात. आज रात्री #ForcedMarriageIsMaritalRape हा हॅशटॅग वापरुन जास्तीत जास्त बॉलिवूड मीम्ससह ट्विट करा. सक्तीच्या विवाहाविरोधात कठोर कायदा करण्याची आम्ही मागणी करत आहोत.
आंदोलकांनी केली एलॉन मस्कची पूजा –
आंदोलक पुरुषांनी ‘मर्द को भी दर्द होता है’ आणि ‘स्त्रीवाद हा कर्करोग आहे’ अशा घोषणा दिल्या आणि यावेळी एलॉन मस्क यांची पूजा करत आणि वैवाहिक बलात्कार कायद्याला विरोध केला. वैवाहिक बलात्कार कायदा निष्पक्ष असावा या मागणीसाठी पुरुषांनी हा निषेध नोंदवला. शिवाय, या कायद्यांतर्गत पुरुषांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि त्यानंतर त्यांना शिक्षा भोगावी लागते. असंही आदोलक सांगितलं.