…अन् एलन मस्कची टेस्ला गोंधळली; गाडीने चंद्रालाच समजले ट्रॅफिक लाइट

टेस्ला कारचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका ट्वीटर युजरने मस्क यांना टॅग करत कारमधील ऑटोपायलट सिस्टमवर लक्ष द्यायला हवे असं सांगितलं आहे.

Tesla cars autopilot feature make mistakes
टेस्लाची इलेक्ट्रिक कार त्याच्या वैशिष्ट्यांमुळे जगातील सर्वात महागड्या कारपैकी एक मानली जाते.

टेस्ला अर्थात स्पेसएक्स ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत इलेक्ट्रिक कार कंपनी आहे. या कार बद्दल आणि तिचा मालक एलन मस्क बद्दल सोशल मीडियावर रोज काही ना काही चर्चा असतेच. या गाडीचे व्हिडीओ , फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक टेस्ला कारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका ट्विटर युजरने मस्क यांना टॅग करत कारमधील ऑटोपायलट सिस्टिमवर लक्ष द्यायला हवे असं सांगितलं आहे. त्याच्या टेस्ला कारच्या ऑटोपायलट सिस्टिमबद्दल काय झाले याचा व्हिडीओ त्याने ट्विटरवर शेअर केले आहे.

गाडी गोंधळली!

एका व्यक्तीने असा दावा केला आहे की कारच्या ऑटो पायलट सिस्टिमने चंद्राला ट्रॅफिक लाइट समजले. त्या व्यक्तीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या पोस्टवर तो कॅप्शनमध्ये लिहतो की “एलोन मस्क कदाचित तुमच्या टीमला चंद्राकडे लक्ष देणाऱ्या ऑटोपायलट सिस्टिमवर लक्ष द्यायला हवे.कारच्या ऑटो पायलट सिस्टिमला चंद्र हा पिवळ्या रंगाची ट्रॅफिक लाइट आहे असे वाटले आणि म्हणून ड्रायव्हरला सिस्टिमने कार हळू करण्याचा इशारा दिला.” या युजरने एलोन मस्कला टॅगही केलं आहे.

काही वेळातच व्हिडिओ झाला व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोक टेस्लाची मज्जा घेऊ लागले. आत्तापर्यंत व्हिडीओला १.१ दशलक्ष लोकांनी बघितला आहे. तर १४ हजाराहून जास्त लोकांनी व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. अडीच हजारहून अधिक रिट्वीट आणि जवळ जवळ दीड हजार कमेंट्सही व्हिडीओला आहेत. काही युजर्सने कारमधील अल्गोरिदमशी संबंधित समस्या असल्याचे कमेंट करून सांगितले तर काही युजर्सने आमची पण गाडी अशीच गोंधळते असं लिहलं. तर एखाने चक्क चंद्र पिवळा का आहे? असाच प्रश्न विचारला आहे.

टेस्लाची इलेक्ट्रिक कार तिच्या वैशिष्ट्यांमुळे जगातील सर्वात महागड्या कारपैकी एक मानली जाते. यात ऑटो पायलट मोड आहे जो जगातील इतर महागड्या आणि लग्जरी कारपेक्षा टेस्लाला वेगळा बनवितो. ऑटोपायलट मोड म्हणजे सेल्फ ड्राइव्ह या मोडवर कार ड्राइव्हर शिवाय चालणे शक्य आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Elon musks tesla cars autopilot feature make mistakes video goes viral ttg

Next Story
फेलिक्स बॉमगार्टनर
ताज्या बातम्या