scorecardresearch

Premium

ह्रदयस्पर्शी! चक्क तीन वर्षानंतर अचानक समोर आली बहिण अन् रडूच कोसळले, पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तीन वर्षानंतर तरुणीला तिची बहीण भेटते. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काही लोकांना त्यांच्या बहीणीची आठवण येऊ शकते. emotional video as a या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तीन वर्षानंतर तरुणीला तिची बहीण भेटते. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काही लोकांना त्यांच्या बहीणीची आठवण येऊ शकते.

emotional video
चक्क तीन वर्षानंतर अचानक समोर आली बहिण अन् रडूच कोसळले (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर बहीण भावाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ भावूक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तीन वर्षानंतर तरुणीला तिची बहीण भेटते. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. काही लोकांना त्यांच्या बहीणीची आठवण येऊ शकते.

हा व्हायरल व्हिडीओ एका बास्केट बॉल कोर्टमधील आहे.या व्हिडीओत तुम्हाला बास्केट बॉल खेळणाऱ्या मुलींचा ग्रुप दिसेल. त्या कोर्टकडे जात असतात. अचानक एक खेळाडूपुढे वर्दी घातलेली तरुणी येते आणि खेळाडू अवाक् होते. ही वर्दी घातलेली तरुणी खेळाडूची बहीण असते. तब्बल तीन वर्षानंतर ती तिच्या बहिणीला भेटते. बहिणीला पाहून तिचे अश्रु अनावर होतात आणि रडायला लागते. तेव्हा तिची बहिण तिला घट्ट मिठी मारते. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येऊ शकतं. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Couple Romance On Running Bike Viral Video Internet is Angry Since Police Arrested Only Boyfriend Calling It Shameless that Girl Ran Away
Video: धावत्या बाईकवर बेभान जोडप्याचा रोमान्स; कारवाईनंतर पोलिसांवरच लोकांचा संताप म्हणाले, “यांना मुलं..”
pet dog helped the owner to plant a tree Emotional Video
अरे देवा! मदत करायला गेला अन् मालकाचं काम वाढवून आला; VIDEO चा शेवट पाहून पोट धरून हसाल
police women struggles to meet her baby child for just 2 minute
VIDEO : शेवटी आईचं काळीज! फक्त २ मिनिटे लेकीला भेटण्यासाठी हिरकणीची धडपड; पोलीस कर्मचारीचा व्हिडीओ व्हायरल
a teacher teaching amazing dance to school students
तारे जमीन पर! चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुरुजींनी शिकवला मनसोक्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : बहीण ही नेहमी दुसरी आई असते! चिमुकल्या भावाबरोबर शाळेत जातानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

motivaton_73yt या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तीन वर्षानंतर बहिणीला भेटली ही खेळाडू”. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ताई तू भावूक केलं.” काही युजर्सना त्यांच्या बहिणीची आठवण आली आहे. अनेक युजर्सनी हार्ट्सचे आणि रडण्याचे इमोजी सुद्धा शेअर केले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Emotional video as a player meet her sister after three years she started crying video goes viral on social media ndj

First published on: 05-12-2023 at 12:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×