Auto Driver Father Decorates Auto On Daughters Birthday : बापासाठी लेक म्हणजे जीव की प्राण असतो. मुलीला काही दुखलं-खुपलं तरी बापाला झोप लागत नाही. लहानपणापासून तिला एखाद्या कळीप्रमाणे तो जपतो. त्यामुळे मुलीच्या आयुष्यातील सर्वांत जास्त विश्वासू पुरुष कोण असेल, तर तो तिचा बाबा असतो. लेक चालायला लागल्यापासून तिला बोबड्या बोलात शिकविण्यापासून ते तिचे प्रत्येक लाड-हट्ट पुरविणारी व्यक्ती म्हणजे तिचा बाबा असतो. म्हणूनच म्हणतात ना बापासाठी लेक रत्नांची खाण असते. यायाच प्रत्यय देणारा एक सुंदर व तितकाच भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर आपसूकच तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओत एक रिक्षाचालक बाप आपल्या मुलीवर किती जीवापाड प्रेम करतो, तिचे प्रत्येक सुख कसे आपले सुख मानून जगतो, याचा अनुभव येईल. दरम्यान, बाप-लेकीच्या नात्याबद्दलचा हा सुंदर व्हिडीओ बंगळुरूमधील आहे; ज्यात एका रिक्षाचालक बापाने आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त खास आपल्या रिक्षाला सजवलेले दिसतेय.

@SumedhaUppal नावाच्या एका एक्स युजरने रिक्षाचालकाचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे; जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका बापाने आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपली रिक्षा खास गुलाबी फुग्यांनी सजवली. वडिलांनी केलेली ही गोष्ट मुलीच्या नेहमी स्मरणात राहील.

येत्या २४ तासांनंतर हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; बुधाच्या मेष राशीतील प्रवेशाने संपणार वाईट काळ

तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “रिक्षाचालकाच्या मुलीचा वाढदिवस होता.” सोशल मीडिया युजर्सनाही हा व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला. अनेकांनी हा व्हिडीओ म्हणजे “इंटरनेटवरील सर्वांत सुंदर गोष्ट”, असे म्हटले आहे. दुसऱ्या युजरने म्हटले, “या व्हिडीओने मेरा दिन बना दिया. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.” तिसऱ्या युजरने लिहिले, “मला खात्री आहे की, जेव्हा ती हा फुगा पाहील तेव्हा ती खूप आनंदी होईल.” चौथ्या युजरने लिहिले, “अशा छोट्या छोट्या गोष्टींतच मोठा आनंद आहे.”

यापूर्वीही आई-वडील आणि लेकाचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात लेकानं आपल्या आई-वडिलांच्या आनंदासाठी त्यांना असे काही सरप्राइज दिले, जे पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असते. विशेष म्हणजे हे सरप्राइज पाहून आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील भाव अगदी पाहण्यासारख होते.

आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आनंदासाठी जेव्हा आपण काही करतो तो दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस असतो आणि हाच मोठा दिवस विवेक वाघ नावाच्या तरुणाने अनुभवला. या तरुणाने आपल्या आई-वडिलांना जयपूरला घेऊन जातो सांगून एअरपोर्टवर नेलं आणि त्यानंतर त्यांच्या हातात पासपोर्ट देत त्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या इंटरनॅशल ट्रीपसाठी सिंगापूरला घेऊन जाण्याचे सरप्राईज दिले

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional video auto driver decorates auto on daughters birthday bengaluru people says cutest thing on the internet sjr