Emotional Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग असते. मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते. या गर्दीत प्रत्येकाकडे कसलं ना कसलं ओझं असते.

बाप होणं काही सोप नसतं हे म्हणतात ते खरंच. बापावर जबाबदाऱ्यांचं ओझं असतं. आपल्या लेकरांसाठी धडपडणारा बाप अनेकदा दु:ख मनात ठेवून, त्यांच्यासाठी झिजत असतो. सकाळी कामावर जातो आणि थकून भागून रात्री घरी येतो. आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हे प्रत्येक बापाला वाटत असतं. म्हणून त्याची दिवस-रात्र धडपड सुरूच असते. पण ही धडपड प्रत्येक लेकराला कळेल असंही नाही. आपला बाप सकाळी घर सोडतो तो कुठे जेवतो काय खातो हे अनेकांना माहितदेखील नसतं. सध्या सोशल मीडियावर एका बापाचा असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

बापाचा व्हिडीओ व्हायरल (Father Emotional Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही त्या बापाच्या कष्टाची जाण होईल. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, लोकलच्या गर्दीत एक माणूस डब्बा खातोय. या गर्दीत बसायला सीट मिळाली नसल्याने तो लोकलमध्ये खालीच बसून आपली भूक भागवताना दिसतोय. सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेला हा बाप दोन वेळचं जेवण ही नीट आनंदात खात नसल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @writer_altaf___001 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “घरच्या जबाबादारीचं ओझं घेऊन स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावपळ करणाऱ्या बापाचं आयुष्य” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.४ मिलियन व्हयुज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बापाशिवाय आयुष्य अर्धवट असतं राव” तर दुसऱ्याने “मला पप्पा नाहीत पण आता मात्र मला समजले वडील काय असतात” अशी कमेंट केली. तर एकाने “बाप म्हणजे आपल्या आयुष्याचा आधार” अशी कमेंट केली. “कोणताही नवस न करता पावणारा देव माणूस म्हणजे बाप” असं एकजण कमेंट करत म्हणाला.