Emotional Video of Mother: संघर्ष कोणाच्या वाटेला नाही आला आहे? सगळ्यांना आयुष्यात कधी ना कधी संघर्ष करावाच लागतो तर काहींचं आयुष्यच संघर्षमय असतं. या सगळ्यात मग परिस्थिती चांगली असो वा वाईट, संघर्ष नावाच्या वादळाला कोणीच डावलू शकत नाही. यात आईचा संघर्षदेखील खूप मोठा असतो.
आई आणि तिच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. जणू ती त्यांच्यासाठीच जगत असते. अशात परिस्थिती वाईट असली की, जगणं अजून अवघड होऊन जातं. पण आई कधीच डगमगत नाही. स्वत:ला कष्ट करेल पण लेकराला ती कसलेच कष्ट होऊ देत नाही.
सध्या आईचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक आई आपल्या लेकरासाठी वाईट परिस्थितीही कष्ट करतेय, नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये जाणून घेऊ या…
आईचा व्हिडीओ व्हायरल (Mother Video Viral)
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून आपसूकच तुमचे डोळे पाणावतील. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक आई आपल्या लहानग्या चिमुकल्याला मांडीवर बसवून ट्रेनमध्ये साफसफाई करतेय. सगळ्यांच्या सीटजवळ जाऊन ती कचरा काढताना दिसतेय. आपल्या लेकराला मांडीवर झोपवून ती हे सगळं करत आहे. मग यासाठी ती बाकी कसलाही विचार करत नाही. जणू तिच्या लेकरानेच तिला ही हिंमत दिली आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @aprajeet_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे, त्यामुळे कोणाची परिस्थिती बघून त्यांची स्थिती ठरवू नका. कारण वेळ बलवान आहे.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २५ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आई ही अशी व्यक्ती आहे जिच्यासमोर संघर्ष सुद्धा झुकतो. आई सारखं कोणी नाही. इतकं निःस्वार्थ, प्रेमळ आणि मजबूत जे कोणत्याही परिस्थितीत झुकत नाही.” तर दुसऱ्याने “फक्त आईच असं करू शकते” अशी कमेंट केली.