Emotional Video Two Indian Aunties Meet After 80 Years Their Friendship Will Bring Tears In Your Eyes Viral Video | Loksatta

Video: मला ‘ती’ ८० वर्षांनी आज पुन्हा भेटली, अजूनही.. ; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण

Emotional Viral Video: एकदा एखादं नातं जुळून आलं तर ते टिकण्यासाठी नेहमी भेटीगाठी, चर्चा, या कुठल्याच औपचारिकतेची गरज नसते. याच प्रत्यक्ष उदाहरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे,

Video Two Indian Aunties Meet After 80 Years Their Friendship Will Bring Tears In Your Eyes Emotional Viral Video
Video: मला 'ती' ८० वर्षांनी आज पुन्हा भेटली, अजूनही.. ; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल 'हा' क्षण (फोटो: इंस्टाग्राम)

Viral Video Today: असं म्हणतात खरं नातं हे कल्पवृक्षासारखं असतं, एकदा का माडाच्या झाडाने खोल जमिनीत आपली मूळ रोवली की मग त्याला वारंवार देखरेखीची गरज भासत नाही. असंच एकदा एखादं नातं जुळून आलं तर ते टिकण्यासाठी नेहमी भेटीगाठी, चर्चा, या कुठल्याच औपचारिकतेची गरज नसते. याच विचाराचं प्रत्यक्ष उदाहरण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, मुकिल मेनन या इंस्टाग्रामरने शेअर केलेला एक व्हिडीओ अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावून चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटवत आहे.

आपण व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की अगदी थकलेल्या दोन वयस्कर आजीबाई एकमेकींना भेटून अत्यंत भावुक झाल्या आहेत. कदाचित या दोघी बालपणीच्या मैत्रिणी असाव्यात म्हणूनच एक एक किस्से आठवतात एकमेकींना टाळ्या देत त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. या आजीबाईंच्या पांढरे राखाडी केस त्यांच्या ८० वर्षाच्या मैत्रीची साक्ष देत आहेत.

मुकिल मेनन यांनी या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिले की. तब्बल ८० वर्षांची ही मैत्री आहे, माझी आजी मला नेहमी सांगायची की तिला एकदा तरी तिच्या जुन्या बालपणीच्या मैत्रिणीला भेटायचे आहे. शेवटी हा योग जुळवून आला आणि या दोघी मैत्रिणी भेटल्या आणि त्यांनी असा त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

.. अन मला ती ८० वर्षांनी पुन्हा भेटली

या व्हिडिओला आतापर्यंत ७३,००० हुन अधिक व्ह्यूज आणि ९००० हुन अधिक लाईक्स आहेत, या व्हिडिओवर अनेकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना कमेंट बॉक्समध्ये आपल्या खास मित्र मैत्रिणीची आठवण आली आहे, तुम्हीही हा व्हिडीओ तुमच्या मित्र मैत्रिणींसह शेअर करून त्यांनाही लवकर भेटायची हिंट द्यायला विसरू नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 11:36 IST
Next Story
Gujarat Election 2022: काँग्रेसच्या सभेत घुसला वळू; भाषण थांबवून मुख्यमंत्री म्हणाले, “भाजपावाले अशाप्रकारे…”