Emotional viral video: आजच्या धावपळीच्या आणि मोबाईलमध्ये अडकलेल्या जगात माणसाचं नातं माणसाशीच तुटत चाललंय, असं वाटतं. पण कधी कधी एखादा क्षण, एखादं गाणं किंवा एखादी भावना पुन्हा सगळ्यांना एकत्र आणते. असाच एक हृदयाला भिडणारा क्षण सध्या गुजरातमधील सुरत शहरातून समोर आला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओनं अनेकांच्या डोळ्यांत नकळत पाणी आणलं आहे.सुरतमधील एका सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाचा हा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमात कथावाचक कथा सांगत होते. वातावरण आधी अगदी नेहमीसारखंच होतं;पण अचानक स्टेजवर एक भावूक गाणं वाजायला सुरुवात झाली आणि सगळंच चित्र बदललं.

हे गाणं होतं “तू कितनी अच्छी है माँ” आईच्या त्यागावर आणि प्रेमावर आधारित हे गाणं ऐकताच संपूर्ण हॉलमधले लोक शांत झाले.व्हिडीओमध्ये दिसतं की, स्टेजसमोर बसलेली मुलं आणि त्यांचे आई-वडील गाणं ऐकताच त्यांच्या भावना दाटून येतात. काही क्षणांतच मुलं आपल्या आई-वडिलांच्या कुशीत जातात, त्यांना घट्ट मिठी मारतात आणि रडू लागतात.

पाहा व्हिडीओ

आई-वडिलांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. हा केवळ रडण्याचा क्षण नव्हता, तर अनेक घरांमध्ये असलेला ‘जनरेशन गॅप’ आणि ‘कम्युनिकेशन गॅप’ मिटवणारा एक पवित्र क्षण होता. मोबाईल, सोशल मीडिया, कामाचा ताण या सगळ्यांपलीकडे जाऊन नात्यांची खरी किंमत या व्हिडीओत दिसते.हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर होताच लाखो लोकांनी पाहिला आणि हजारो प्रतिक्रिया व्हिडीओखाली आल्या.

एका युजरने लिहिले, “आजच्या काळात असे संस्कार फार गरजेचे आहेत.” दुसऱ्याने म्हटले, “कथावाचकानं कमाल केली; पण हे गाणं ऐकून मलापण रडू आलं.”तर आणखी एका युजरने भावूक शब्दांत लिहिले, “या जगात आई-वडिलांचं नातं एकमेव असतं, जे नि:स्वार्थी असतं. आपल्या वागणुकीमुळे त्यांच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ नयेत, हीच खरी जबाबदारी आहे.”