Squirrel Emotional viral video : कधी कधी सोशल मीडियावर असे व्हिडीओ समोर येतात की, ते पाहिल्यावर आपण चकित होतो. डोळ्यांत आपोआप पाणी येत आणि मनात एकच विचार येतो. श्रद्धा ही फक्त माणसांची नसते. असाच एक व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. एका मंदिरात, शांत वातावरणात, महादेवाच्या मूर्तीसमोर एक छोटीशी खारुताई उभी आहे. ना कोणाचं भान, ना आजूबाजूला गोंधळ. अगदी माणसासारखी, दोन हात जोडून ती खारुताई जणू काही मनापासून देवाकडे काही मागत आहे.
तो क्षण इतका साधा असूनही मनाला खूप खोलवर स्पर्श करून जातो. खारुताईची ती छोटीशी नजर पाहिली की, मन भावूक होतं. तिच्या डोळ्यांत कुठलाही स्वार्थ नाही, कुठलीही मागणी नाही. फक्त देवावरची निरागस श्रद्धा आणि विश्वास दिसतो. आपण रोज देवळात जातो, हात जोडतो, प्रार्थना करतो. कधी इच्छा असते, कधी अपेक्षा असतात. तशीच ती खारुताई प्रार्थना करते.
हा व्हिडीओ पाहिल्यावर लोकांच्या मनात एक भावना निर्माण होते. काही जणांना असं वाटतं की कदाचित पूर्वी कधीतरी प्राण्यांनी महादेवाचं दर्शन घेतलं असावं. त्यामुळेच ती आठवण त्यांच्या पिढ्यान् पिढ्या मनात राहिली आहे. आजही जेव्हा ते महादेवाची मूर्ती पाहतात, तेव्हा आपोआप त्यांचं मन तिथे ओढलं जातं. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून महादेवाचं पशुपतिनाथ हे नाव आठवलं. कारण- महादेव हे फक्त माणसांचेच देव नाहीत, तर सगळ्या सजीवांचे रक्षक आहेत.
पाहा व्हिडीओ
पशू, पक्षी, झाडं सगळ्यांवर त्यांची कृपा असते. त्या छोट्याशा खारुताईचं निरागस वागणं पाहिलं कोणीही भावुक होईल. अनेक लोक म्हणतात की, आज पाहिलेल्या सगळ्या व्हिडीओंपैकी हा व्हिडीओ मनाला सगळ्यात जास्त भिडतो. आजच्या धावपळीच्या आयुष्यात सगळे काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत आहेत. अशा वेळी ही छोटी खारुताई आपल्याला एक साधा, पण मोठा धडा देते. भक्ती म्हणजे काही मागणं नाही, तर शांत मनाने जोडलेले हात आहेत.
हा व्हिडीओ ट्विटर वरुन या @Hinduism_sci अकाऊंट वरुण शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यावर मन आपोआप शांत होतं. ओठांवर हलकंसं हसू येतं आणि थोडा वेळ सगळ्या चिंता विसरायला होतात. असं वाटतं की, महादेव आजही आपल्या आजूबाजूला आहेत. कधी माणसाच्या रूपात, तर कधी अशा निरागस खारुताईच्या रूपात.
