गाडी चालवताना अनेकदा आपल्या सुरक्षिततेसाठी आपण हेल्मेट घालतो. शिवाय वाहतूक विभागाकडून हेल्मेट घालण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे दुचाकी किंवा स्कूटी चालवतानाच आपण हल्मेट वापरतो. आतापर्यंत तुम्ही लोकांना बाईकवरुन जाताना किंवा एखाद्या इमारतीच्या बांधकामादरम्यान कामगारांनी हेल्मेट घातल्याचं पाहिलं असेल. पण सध्या अशा घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील एका कार्यालयात काम करताना कर्मचाऱ्यांनी चक्क हेल्मेट घातल्याचं दिसून येत आहे.

तर या कर्मचाऱ्यांवर हेल्मेट घालून काम करण्याची वेळ का आली? याबाबतची माहिती समजल्यावर तुम्हाला तेथील प्रशासनाचा राग आल्याशिवाय राहणार नाही. हो कारण सध्या व्हायरल होत असलेली घटना ही बागपत जिल्ह्यातील विद्युत विभागातील असून येथील खेकरा आणि बारोटमध्ये विद्युत चाचणीसाठी बांधलेल्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. या इमारतीचे प्लास्टर अधुनमधून तुटून खाली पडते त्यामुळे आपल्याला काही दुखापत होऊ नये म्हणून आपण हेल्मेट घालतो असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
Nagpur, RTI Activist, Alleges, Factory Blast case, Torn Application, Directorate of Industrial Safety and Health Management,
सोलार कंपनीतील स्फोट प्रकरण : कारवाईबाबत माहिती मागितली तर अर्जच फाडला; माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा

हेही पाहा- Video: …म्हणून सर्वांसमोर सासरच्या महिलेने नवऱ्याच्या तोंडाला काळं फासलं; कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क

प्लास्टर पडण्याच्या भीतीने कर्मचाऱ्यांनी घातलं हेल्मेट –

हेही पाहा- रेल्वे प्रवासादरम्यान सिगारेट पित होती तरुणी; एका प्रवाशाने थेट रेल्वे मंत्र्यांना Video टॅग केला अन्…

या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुखापत होण्याची भीती वाटते. कारण, या आधी प्लास्टर पडल्याने अनेकदा कर्मचारी जखमीही झाले आहेत. त्यामुळे भीतीपोटी विद्युत विभागाचे कर्मचारी हेल्मेट घालून कार्यालयात काम करत असतात. पावसाळ्यातही इमारतीचे छत गळत असल्याने ते कधी कोसळेल, अशी भीतीही कर्मचाऱ्यांच्या मनात असते.

तक्रार करूनही दुरुस्त नाही –

मिळालेल्या माहितीनुसार, बागपतमध्ये चार इलेक्ट्रिकल टेस्टिंग स्कूल आहेत, त्यापैकी दोन बारोटमध्ये, एक खेकरामध्ये आणि एक बागपतमध्ये आहे. सहाय्यक अभियंता, नोडल अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कंत्राटी कर्मचारी असे ४५ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. मात्र बारोट व खेकरा येथील इमारतींची दुरवस्था झाली आहे. येथील कार्यालयाबाबत वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

अनेकदा तक्रार करूनही इमारत दुरुस्त न झाल्यामुळे आता या कार्यालयातील कर्मचारी हेल्मेट घालून काम करतात. सध्या याच कर्मचाऱ्यांचा व्हायरल होत आहे. दरम्यान, या घटनेबाबत अधीक्षक अभियंत्याकडून चौकशीचा अहवाल मागवण्यात आला असून, आम्ही पॉवर कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही पत्रव्यवहार करुन हे ऑफिस नवीन इमारतीत हालवणार असल्याचं जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.