scorecardresearch

Video: युद्धाविरोधात ना’राजीनामा’… एकाच वेळी Live Telecast दरम्यान सर्वांनी सोडली नोकरी

रशियामधील बातम्या देणारं हे चॅनेल बंद करण्यात आलं.

रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान सुरू असलेल्या युद्धाला अनेक रशियन लोकांचा देखील विरोध आहे. युद्धाला नकार देत रशियाच्या एक आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी ऑन एअर राजीनामा दिला आहे. या सर्व कर्मचार्‍यांनी त्यांच्या अंतिम प्रसारणात “नो टू वॉर” म्हणत राजीनामा दिला. रशियन अधिकार्‍यांनी युक्रेन युद्धाच्या कव्हरेजबद्दल त्यांचे ऑपरेशन स्थगित केल्यानंतर टीव्ही रेनच्या (Dozhd) कर्मचार्‍यांनी हा निर्णय घेतला.

रशियाच्या शेवटच्या स्वतंत्र वृत्तवाहिनींपैकी एक असलेल्या या वाहिनीवरील पत्रकारांनी शांततेसाठी भूमिका घेण्याचे ठरवले. या कर्मचार्‍यांनी स्टुडिओमधून बाहेर पडताना चॅनेलच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या नतालिया सिंदेयेवा “नो टू वॉर” म्हणजेच युद्धासाठी नाही म्हणाल्या. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रशियामधील बातम्या देणारं हे चॅनेल बंद करण्यात आलं. परंतु बोर्डाच्या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर ते YouTube वर प्रसारित होत असल्याचे दिसत होते.

Ukraine War: “आम्ही चर्चेसाठी तयार, पण…;” पुतिन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या ‘या’ तीन अटी

दरम्यान, स्टेट डिपार्टमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की, “रशियाचे सरकार ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा प्रयत्न करतंय. रशियन लोक जगभरातील लोकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. परंतु सरकार त्यावर बंधनं आणतंय.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Entire staff of russian news channel resigns during live broadcast russia ukraine war hrc

ताज्या बातम्या