Nepal Flood Viral Video : नेपाळ-चीन सीमेवरील पुरामुळे मृतांची संख्या १,००० च्या वर गेली आहे, ज्यामध्ये नेपाळमध्ये ९८७ आणि चीनमध्ये १६ मृत्यूंची नोंद झाली आहे. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, ११,८१४ लोकांना वाचवण्यात आले आहे आणि बचाव पथके अजूनही प्रभावित भागात आणि जलविद्युत बोगद्यांमध्ये हजारो बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. दरम्यान, अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याने नेपाळमध्ये पुन्हा एकदा पुराचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे आपत्तीग्रस्त भागात धोक्याची चिंता आणखी वाढली आहे.

या सुरू असलेल्या पुराच्या संकटादरम्यान लाईटहाऊस जर्नालिझमला (Lighthouse Journalism) असे आढळून आले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही जुने असंबंधित व्हिडीओ नेपाळच्या पुराचे ताजे फुटेज म्हणून मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. मात्र, तपासात असे आढळून आले की, हे व्हिडीओ एकतर जुने आहेत अथवा सध्याच्या पुराशी संबंधित नाहीत किंवा एआय (AI-generated)द्वारे तयार करण्यात आले आहेत.

काय होत आहे व्हायरल?

१. इन्स्टाग्राम युजर ‘Tireless Students Hub’ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह एक व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये लिहिले गेलेय, “हिमालयाची अफाट, अनियंत्रित ताकद पाहा, जिथे ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड (GLOF) वास्तविक वेळेत (रिअल-टाइममध्ये) घडताना दिसत आहे. हे फुटेज नेपाळमधील निसर्गाची प्रचंड ताकद टिपते, जिथे बर्फाचे धरण कोसळल्याने पाण्याचा प्रचंड प्रवाह प्रचंड वेगाने फोफावत पुढे जात राहतो, ज्यामुळे मोठ्या दऱ्या तयार होतात आणि पृष्ठभागाखालील चमकदार निळा बर्फ खाली कोसळतो.”

https://www.instagram.com/reels/DciJct_yls1

इतर युजर्सनीही असेच दावे करत हाच व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reels/DckaZ_UTOAQ

२. X युजर Said Ercan यांनी आणखी एक व्हायरल व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये पुराच्या पाण्याचे मोठमोठे प्रवाह वेगाने दगड-मातीच ढिगारे घेऊन गावात शिरतात, ज्यामुळे सर्व गाव वाहून जात असल्याचे दिसत आहे. हे संकलित केलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओ क्लिप्सद्वारे दिसून येते.

इतर युजर्सनीही असेच दावे करत हाच व्हिडीओ शेअर केला आहे.

३. X युजर रवी शंकर सिंग यांनी त्यांच्या प्रोफाईलवर हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला. युजरने दावा केला की, “नेपाळमध्ये झालेल्या या भयानक विनाशाचे दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहतो; व्हिडीओमध्ये पाहा की ढिगाऱ्याखाली लोकांची मृत्यूशी झुंज सुरु आहे, एका ठिकाणी कोणीतरी आपल्या उघड्या हातांनी ढिगारा उपसून आपल्या प्रियजनांचा शोध घेत आहे, तर दुसरीकडे बचाव पथक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत.”

इतर युजर्सदेखील तत्सम दाव्यासह हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

दावा १:

आम्ही इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड करून आणि त्यातून कीफ्रेम्स (keyframes) काढून आमचा तपास सुरू केला.
https://www.instagram.com/reels/DciJct_yls1/

त्यानंतर आम्ही व्हिडीओमधून मिळवलेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले.

त्यातून आम्हाला असे आढळून आले की, हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम युजर ‘helipilotleigh’ने २१ ऑगस्ट रोजी पोस्ट केला होता. कॅप्शनमध्ये म्हटले होते की, (भाषांतर) : Jökulhlaup, ज्याला GLOF किंवा ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड (Glacial Lake Outburst Flood), असेही म्हणतात. असे तेव्हाच घडते जेव्हा हिमनदीतील बर्फात अडकलेल्या पाण्याला अचानक बाहेर जाण्याचा मार्ग मिळतो. हा प्रचंड दाब मोठ्या हिमनगाला वर उचलू शकतो आणि त्याला तोडू शकतो, ज्यामुळे तलावच्या तलाव हिमनदीच्या खालून वेगाने वाहून पुढे जातो, आणि अविश्वसनीय वेगाने उतारावरून खाली धाव घेतो. ही बऱ्यापैकी सामान्य घटना असली तरी ती अतिशय दुर्गम भागात घडत असल्याने कॅमेऱ्यात कैद होणे दुर्मीळ असते. अलास्कामधील कोलंबिया ग्लेशियरवरील ही घटना २०१४ पासून दरवर्षी घडत आहे.

जेव्हा एका सोशल मीडिया युजरने विचारले की, हाच तो तलाव आहे का ज्यामुळे नुकताच पूर आला होता? तेव्हा त्या वापरकर्त्याने उत्तर दिले की, हा व्हिडीओ अलास्काचा आहे, नेपाळचा नाही.

नेपाळ पुराशी जोडला गेलेला ग्लेशियल लेक आउटबर्स्टचा दिशाभूल करणारा व्हिडीओ प्रत्यक्षात नेपाळचा नसून अलास्काचा असल्याचे आढळले.

दावा २:

या व्हिडीओमध्येही आम्ही व्हायरल व्हिडीओमधून मिळवलेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले.

सर्च परिणामांवरून असे समजले की, हा व्हिडीओ ५ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यातील धराली गावात अचानक आलेला विनाशकारी पूर (flash floods) आणि भूस्खलना (mudslide)शी संबंधित आहे.

आम्हाला व्हायरल व्हिडीओ दाखवणारे अनेक बातम्यांचे अहवाल (news reports) सापडले.

https://moneycontrol.com/city/massive-flash-flood-sweeps-away-houses-cattle-in-uttarkashi-as-silt-gushes-down-from-hill-video-article-13392581.html

https://www.ndtv.com/india-news/glacial-lake-burst-behind-uttarakhand-floods-a-look-at-previous-instances-9036895

टाइम्स ऑफ इंडियाच्या (Times of India) इन्स्टाग्राम पेजनेही हाच व्हिडीओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की, “#Uttarkashi ढगफुटीचा कहर: #Dharali मध्ये अचानक आलेल्या पुरामुळे घरे, हॉटेल्स गिळंकृत, किमान ४ ठार; संपूर्ण गाव वाहून गेले.”

त्यामुळे हे स्पष्ट झाले की, २०२५ मधील उत्तरकाशीतील पुराचा व्हायरल व्हिडीओ नेपाळ पुराचा असल्याचा दिशाभूल करणारा दावा करून शेअर केला गेला आहे.

दावा ३:

लाईटहाऊस जर्नालिझमला (Lighthouse Journalism) व्हिडीओमध्ये काही विसंगती आढळल्या आणि त्यांनी तो AI कंटेंट डिटेक्टरद्वारे तपासण्याचा निर्णय घेतला.

AI कंटेंट डिटेक्टर ‘ह्युमन मीटर’ (Human Meter) ने सुचवले की, हा व्हिडीओ AI-निर्मित (AI generated) आहे.

आम्ही गूगलच्या इन्व्हेस्टिगेशन एजंट “बॅकस्टोरी” (Backstory) द्वारे या व्हिडीओचे स्क्रीनशॉट्सदेखील तपासले. या टूलने सुचवले की, या फोटोमध्ये जनरेटिव्ह एआय (Gen AI) पॅटर्न दिसत आहेत.

परिणामात असे म्हटले होते: इनपुट फोटो आणि त्याच्या प्रतींच्या विश्लेषणामध्ये एआय प्रतिमा निर्मितीशी (AI image generation) सुसंगत पॅटर्न आढळले आहेत, जे सूचित करतात की, हे फोटो एआय-निर्मित किंवा एआय-मॅनिप्युलेटेड असू शकतात.

निष्कर्ष :

लाईटहाऊस जर्नालिझमच्या (Lighthouse Journalism) निदर्शनास आले की, हे तिन्ही व्हिडीओ सुरू असलेल्या नेपाळ पुराशी जोडणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केले जात आहेत. पहिला व्हिडीओ प्रत्यक्षात अलास्कातील कोलंबिया ग्लेशियर येथे रेकॉर्ड करण्यात आला होता आणि दुसऱ्या व्हिडीओमध्ये उत्तराखंडच्या धराली गावातील २०२५ मधील अचानक आलेला पूर दिसत होता; तर तिसऱ्या व्हिडीओमध्ये एआय-निर्मित किंवा एआयद्वारे फेरफार केलेल्या सामग्रीशी सुसंगत चिन्हे होती. जुने, असंबंधित आणि AI निर्मित व्हिडीओ ताज्या घटनेचे असल्याचे दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केले गेले.