सध्या एस्कलेटर म्हणजेच सरकते जिने सर्रास पाहायला मिळतात. पूर्वी जेव्हा एस्कलेटर भारतात दाखल झाले तेव्हा एखादी जादू बघावी तसे लोक या जिन्यांकडे पाहायचे. त्यावर पाय टाकताना गोंधळून कित्येकांचं कंबरडं मोडलं असेल याची गीणतीच नाही.पण आता आपल्याला या जिन्यांची हळूहळू सवय होऊ लागली आहे. ७-८ वर्षाचं चिमुरडं पोर अगदी सहज एस्कलेटरवर पाय टाकून युद्ध जिंकल्याचा अविर्भाव चेहऱ्यावर आणतं. आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात.मात्र याच सुविधा कधी कधी आपल्या जिवावर बेतू शकतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये सरकता जिना अचानक उलटा फिरला आणि लोक अक्षरश: खाली पडले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही सरकत्या जीन्याचा वापर करताना १०० वेळा विचार कराल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो, मॉल असो की एखादे मोठे हॉटेल आजकाल सरकते जिने जवळपास सर्वच ठिकाणी पाहायला मिळतात. सुरुवातीला या सरकत्या जिन्यांवर पाय ठेवायलाही घाबरणारी मंडळी. आता चांगलीच सरावली आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच नागरिक सरकत्या जिन्याचा उपलब्धतेनुसार लाभ घेतात. त्यामुळे जिन्यांवरुन चालण्याचा त्रास वाचतो. खास करुन गर्भवती महिला, वृद्ध लोक आणि लहान मुले यांना त्याचा फायदा अधिक. पण हाच सरकता जिना उलटा फिरला तर? दक्षिण कोरिया येथील सरकत्या जिन्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात असेच घडले आहे. सरकता जिना अचानक उलटा धावू लागला. त्यामळे झाले असे की, सरकत्या जिन्यावर चढलेले लोक अचानक मागे फेकले गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या बांधावरुन भावाभावांची भांडणं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं तरीही…

या अपघातात जिन्यावरील लोक पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहेत. या घटनेत १४ लोक जखमी झाल्याचे समजते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Escalator accident video escalator suddenly turns upside down in south korea people collapse like a house of cards watch video srk
First published on: 08-06-2023 at 17:35 IST