करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला मदत करण्याच्या हेतूने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. यामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेला हाताळताना झालेल्या चुकांचा उल्लेख असून तिसऱ्या लाटेचा सामना करताना नेमकं काय करण्याची गरज आहे याची माहिती यामध्ये देण्यात आली होती. तिसरी लाट आल्यास आपली प्रतिक्रिया काय असावी याची ही ब्ल्यूप्रिंट असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं. या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान राहुल गांधी यांच्या मागे माऊंट एव्हरेस्टच्या पर्वत रांगांचा फोटो दिसत आहे. हा फोटो कोणी काढला अशी चर्चा करण्यात येत होती. आता त्याबद्दल माहिती समोर आली आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर आर्किटेक्टने विचारला प्रश्न

या फोटोमध्ये हिमालयाच्या पर्वत रांगा दिसत आहेत. काँग्रेस नेते श्रीनिवास बी.वी. यांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर केला तेव्हा वास्तुरचनाकर सीतू महाजन कोहली यांनी राहुल गांधी यांचा भाचा रेहान राजीव वड्राला टॅग करत हा फोटो तुझा आहे का असा प्रश्न केला. सीतू महाजन कोहली यांनी रेहानला टॅग करत मला पाठीमागे दिसत असलेला फोटो खूप आवडला. तो खूपच सुंदर आहे. हा फोटो तुझा आहे का रेहान? असे लिहिले आहे.

यावर रेहाने ट्विटवरुन हा असे उत्तर दिले आहे. त्यावर सीतू यांनी सुंदर तू पहिल्यापासूनच माझा आवडता फोटोग्राफर आहे. मलाही असाच एक फोटो हवा आहे, असे म्हटले. त्यावर रेहनाने आभार मानत मला आनंद आहे की हा फोटो तुम्हाला आवडला असे म्हटले. रेहानने हा फोटो विमान हिमालयावरून जात असताना काढला होता.

 

रेहान हा राहुल गांधी यांची बहिण प्रियंका गांधी यांचा मुलगा आहे. २० वर्षीय रेहानला फोटोग्राफीची आवड आहे. इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर सक्रिय आहे. तिथे तो फोटो टाकत असतो. राहुल गांधीच्या मागे असलेला हा फोटो रेहानने फेब्रुवारीमध्ये इन्स्टाग्रामवर टाकला होता.