Viral video: एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अनेकदा प्रेमात पडलेल्या या तरुणांना आपण नेमकं काय करतोय याची तितकी समजही नसते. सोशल मीडियावर प्रेमाबाबत तुम्ही अनेकदा वाचले असेल किंवा ऐकले असेल. कधी प्रेमामुळे आई-वडिलांकडून मार, तर कधी आई-वडिलांपासून लपविलेले प्रेम, असे प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से तुम्ही ऐकले किंवा वाचले असतीलच. कधी कधी या नात्यांमध्ये वादही होतात आणि हेच वाद टोकालाही जातात. एवढे की, ज्यांच्यावर ते प्रेम करतात, त्यांच्याच जीवावर उठायला लोक मागे-पुढे पाहत नाहीत. दरम्यान, अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. त्यामध्ये एका तरुणानं आपल्या गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा असं कृत्य केलंय की, पाहून तुम्हीही सुन्न व्हाल.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ही घटना घडली. त्यामध्ये भरदिवसा पेट्रोल पंपावर तरुणानं गर्लफ्रेंडला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाला राग अनावर झाला. तरुणीवर हल्ला करणार्‍याला माणूस म्हणावं की हैवान, असा प्रश्न उपस्थित झालाय. हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमा झाली. एक जण तरुणाला रोखण्यासाठी पुढे आला नाही. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पेट्रोल पंपावर हा माणूस मुलीला अमानुषपणे मारहाण करीत आहे आणि बघणारे प्रेक्षक बनले आहेत. कोणीही पुढे जाऊन निष्पाप महिलेला मदत करण्यास धजावत नाही.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Heart touching video of police who help poor man on road video goes viral
“शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा; VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी
An emotional video of a delivery boy having food in the middle of the road while delivering an order went viral on social media
परिस्थिती सगळं काही शिकवते! डिलिव्हरी बॉयचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात येईल पाणी
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Karnataka auto driver finds the house of passenger to return her missing gold chain, receives accolades.
VIDEO: लाखाला भारी पडला प्रामाणिकपणा! महिलेची सोन्याची चैन परत करण्यासाठी रिक्षा चालकानं काय केलं पाहा

पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरताना तरुण आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढला आणि जोरदार मारामारी झाली. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला जमिनीवर पाडून अमानुषपणे मारहाण केली. तरुणानं अक्षरश: तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. यावेळी पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या जमावासमोर हा तरुण गर्लफ्रेंडला मारहाण करीत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र, कोणीही मध्यस्थी करून, त्या तरुणाला मारहाण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उपस्थितांनी या घटनेचे त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईकरांचा नाद नाय! लोकलमध्ये साजरी केली जबरदस्त दिवाळी; प्रत्येक मुंबईकरानं पाहावा असा VIDEO

या तरुणानं गर्लफ्रेंडला का मारहाण केली हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेतली असून, आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत साहिबााबादच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Story img Loader