आपको हमारी भी उम्र लग जावे! लालूंच्या वाढदिवशी राबडी देवींच्या खास शुभेच्छा

ट्रोलर्सनी फोटो एडिट करुन राबडी देवी आणि लालूंच्या हातात गुलाबाच्या फुलाऐवजी चारा दाखवला.

(छायाचित्र सौजन्य, राबडी देवींचं ट्विटर हँडल )

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी मंगळवारी अर्थात 11 जून रोजी वयाची 71 वर्षे पूर्ण केली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाटणा येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांनी 72 पाउंडचा केक कापून आनंद साजरा केला. तर, बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनीही ट्विटरद्वारे लालूंना शुभेच्छा दिल्या.


लालूंना शुभेच्छा देताना राबडी देवींनी, ‘प्राणप्रिय आदरणीय श्री लालू जी को 72वें अवतरण दिवस की अनंत बधाईयाँ. आपको हमारी भी उम्र लग जावे’ असं ट्विट केलं. या ट्विटसोबतच त्यांनी लालूंना गुलाबाचं फूल देत असतानाचा एक सुंदर फोटो शेअर केला. त्यांचं हे ट्विट नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे. अनेकांकडून त्यांच्या ट्विटला लाइक आणि रिट्विट केलं जातंय पण त्याचसोबत काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याची संधीही सोडलेली नाही. ट्रोलर्सनी तो फोटो एडिट करुन राबडी देवी आणि लालूंच्या हातात गुलाबाच्या फुलाऐवजी चारा दाखवला आहे.


राजदचे सर्वेसर्वा आणि चारा घोटाळाप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेले लालू यादव सध्या रांचीतील रिम्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


लालू यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांनीही राहत्या घरी केक कापून वडिलांचा जन्मदिन साजरा केला, याशिवाय लालूंच्या अनुपस्थित पक्षाची सर्व जबाबदारी सांभाळणारा त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनीही लालूंना ट्विटरद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ex cm bihar rabri devi wishes lalu prasad yadav on his birthday sas

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या