scorecardresearch

Premium

Shocking: कचऱ्यात फेकलेल्या पेटिंगला मिळाले १.५८ कोटी, एवढं त्यात होतं तरी काय?

बापरे! कचऱ्यात फेकलेल्या पेटिंगला मिळाले १.५८ कोटी

expensive painting sold for 1 58 crore rupees
कचऱ्यात फेकलेल्या पेटिंगला मिळाले १.५८ कोटी (फोटो -bonhams1793)

घरात ठेवलेल्या जुन्या वस्तू अशाच फेकून देऊ नका. कदाचित ते तुम्हाला श्रीमंत बनवतील. आज आम्ही अशाच एका पेंटिंगबद्दल सांगणार आहोत, जी भांगारात पडली होती पण त्याला कोट्यवधींची किंमत मिळाली आहे. नुकतेच ब्रिटनमधील एका महिलेसोबत असेच काहीसे घडले. काही वर्षापूर्वी नाममात्र किंमतीत एक पेंटिंग विकत घेतली होती. ती घरात पडून होती. एके दिवशी महिलेला वाटले की हा कचरा फेकून द्यावा. तो विकण्याच्या उद्देशाने तिने त्याचा फोटो फेसबुकवर शेअर केला. त्यानंतर चित्राबाबत ज्या गोष्टी समोर आल्या त्या आश्चर्यकारक होत्या.

न्यू हॅम्पशायर थ्रीफ्ट स्टोअरमधून या महिलेने केवळ $4 म्हणजेच रु. 332 मध्ये खरेदी केलेली ही पेंटिंग $191,000 रु. 1.58 कोटीमध्ये लिलाव झाला. एवढ्या स्वस्तात विकत घेतलेल्या पेंटिंगसाठी कोणीतरी अचानक इतके पैसे कसे दिले याबद्दल जाणून या महिलेला स्वतःच नवल वाटले आहे.

आता तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की या पेंटिंगमध्ये विशेष काय होतं?

वास्तविक, तज्ञांच्या मते, सुप्रसिद्ध कलाकार एन.सी. वायथ यांची अनेक वर्षांपासून ही हरवलेली पेंटिंग आहे. त्यांची ही पेटिंग एक उत्कृष्ट नमुना होता. हेलेन हंट जॅक्सनच्या १८८४ मधील पुस्तक रामोनाच्या १९३९ आवृत्तीसाठी पेनसिल्व्हेनिया-आधारित कलाकाराने तयार केलेल्या चार पेंटिंगपैकी एक पेंटिंग रॅमोना नावाची होती. पेंटिंगमध्ये एक अनाथ तरुणी तिच्या सावत्र आईशी संघर्ष करताना दाखवण्यात आली आहे.

पाहा पेंटिंग

हेही वाचा >> लक्षात ठेवा! डाव कधीही पलटू शकतो; ‘हा’ VIDEO पाहून कळेल ‘संयम’ का महत्वाचा आहे…

प्रसिद्ध चित्रकारांनी चितारलेली पेंटिंग्ज संग्रही असणे, हे स्टेटस सिम्बॉल समजले जाते, त्यामुळे ही पेंटिंग्ज खरेदी करण्यासाठी जगभरातील धनाढ्य व्यक्ती लाखो डॉलर्स मोजताना पाहायला मिळतात. मात्र या जगातील काही अतिशय प्रसिद्ध समजली जाणारी पेंटिंग्ज कोणाचीही खासगी मालमत्ता नसून, सर्वसाधारणपणे मोठमोठ्या संगाराहालायांमध्ये पहावयास मिळतात. पण म्हणून यांची किंमत कमी असते असे नाही. जर या पेंटिंग्जची किंमत विचारात घेतली, तर ही पेंटिंग्ज जगातील सर्वात महागडी पेंटिंग्ज ठरतील यात शंका नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर पॅरिस येथील जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयामध्ये असलेल्या, लियोनार्डो दा विन्ची ने बनविलेल्या ‘मोनालिसा’चे देता येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Expensive painting sold for 1 58 crore rupees women previously brought it for 332 rupees but why know reason srk

First published on: 21-09-2023 at 17:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×