Shocking video: नवरा बायकोचं नातं हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतं. त्यातील एकानेही घराबाहेर दुसरं नातं बनवलं तर त्या नात्याला तडा जातो. गेल्या काही वर्षांपासून बदलेल्या जीवनशैली आणि नात्याकडे बघण्याचा दृष्टीकोन किंवा अजून काही…तो व्यक्ती घराबाहेर प्रेम शोधत…जेव्हा जी गोष्ट घरात कळते तेव्हा वाद, भांडण अगदी मारामारी पर्यंत गोष्टी जातात…नातं जपण्यासाठी प्रयत्नही केला जातो. पण नात्यामधील आलेल्या दरीमुळे ते नातं संपतं. लग्न आणि संसाराविषयी नवरा बायको दोघांनीही स्वप्न रंगवली असतात. पण दोघात तिसरा येतो तेव्हा या स्वप्नाना तडे जातात. अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक बायकोनं आपल्या नवऱ्याला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

जसं नवरा बायकोचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर असतं तसंच प्रियकर आणि प्रियसीचं नातं असतं. आज काल एकाच वेळी दोन जणांशी नाती ठेवल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर विश्वासाला तडा जाणारी एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. एक व्यक्ती गुपचूप आपल्या प्रेयसीसोबत फोनवर गप्पा मारत होता. पण तेवढ्यात बायकोनं त्याला रंगेहात पकडलं. आणि मग नवऱ्याकडून त्या तरुणीचा पत्ता मिळवला आणि तिच्या घरी जाऊन तिनं काय केलं हे आता तुम्हीच पाहा.

ही घटना उत्तर प्रदेशमधील मुज्जफरनगरमधील अलीपुर खुर्द या ठिकाणी घडली आहे. बायकोनं नवऱ्याला रंगेहात पकडलं. त्यानंतर त्याच्या फोनमधून त्या मुलीचा पत्ता मिळवला आणि थेट तिच्या घरात शिरली. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेनं या तरुणीला घरातून बाहेर खेचलं आणि भर चौकात आणून तिला बेदम मारलं आहे. यावेळी तरुणीनं प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करत होती पण महिलेच्या ताकतीपुढे तिचं काहीच चाललं नाही.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @TrueStoryUP या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आयुष्य खूप छोटं आहे, विश्वास आणि प्रेमाने नाती जपा. जी व्यक्ती तिच्यावर प्रेम करते, विश्वास करते त्यांना कधीही दुखवू नका. धावपळीच्या आयुष्यात नात्याला वेळ द्या. एकमेकांना समजून सुसंवाद आणि वेळ दिल्याने नातं अधिक मजूबत होतं. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.