कपडे, गृहसजावट आणि जीवनशैली उत्पादनांशी संबंधित असलेल्या फॅबइंडियाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘जश्न-ए-रिवाज’ जाहिरातीच्या माध्यमातून कॅम्पेन सुरु केले होते. यावरुन बराच वाद निर्माण झाला होता. भाजपाने या जाहिरातीला तीव्र विरोध केला होता. दरम्यान, फॅबिंडियाने सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाल्यानंतर दिवाळीसाठी त्यांच्या नवीन कलेक्शनचा प्रचार करणारे एक ट्विट डिलीट केले आहे. फॅबिंडियावर हिंदू दिवाळीच्या सणाला ‘अपमानित’ करण्याचा आणि त्याला ‘जश्न-ए-रिवाज’ म्हणण्याचा आरोप करण्यात आला होता. 

फॅब इंडियाने एक ट्विट करत म्हटले होते की, “आम्ही प्रेम आणि प्रकाशाचा सणाचे स्वागत करतो, फॅबइंडिया द्वारे जश्न-ए-रिवाज ही अशी एक संकल्पना आहे जी भारतीय संस्कृतिला समर्पित करते.”, याला सोशल मीडियावर जोरदार विरोध झाला. हे ट्विट फॅबइंडियाने डिलीट केले आहे.

सौजन्य – ट्विटर

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या म्हणाले होते की, दिवाळी ‘जश्न-ए-रिवाज’  नाही. अशा हेतुपुरस्सर गैरप्रकारासाठी आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल. 

फॅब इंडियाच्या या कॅम्पेनवरुन मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे चेअरमन मोहनदास पाई यांनी टीका केली होती. त्यांनी असे म्हटले की, “दिवाळीच्या निमित्त फॅब इंडियाचे हे अत्यंत लज्जास्पद विधान आहे. दिवाळी हा एक हिंदू धार्मिक सण आहे. ज्याप्रकारे क्रिसमस आणि ईद हे दुसऱ्यांचे सण आहेत. अशा पद्धतीचे विधान एका धार्मिक सणाला संपुष्टात आणण्याचा विचार करुन केलेला प्रयत्न दाखवून देतो.”

भाजपाचे उत्तर प्रदेश प्रवक्ते प्रशांत उमराव यांनी ट्विट करत टीका करत म्हणाले, “फॅबइंडियाचे कपडे खूप महाग आहेत आणि एकदा धुतल्यावर निरुपयोगी होतात, इतर ब्रँडमध्ये जाण्याची गरज आहे.”