Video Shows Bangladesh Islamists attacked Hindu man of the village : बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना या भारतात आल्या आहेत. त्यानंतर बांगलादेशातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, यातले नेमके कोणते व्हिडीओ खरे किंवा खोटे हे न पाहता, ते सोशल मीडियावावर रिपोस्ट केले जात आहेत. तर आज पुन्हा एकदा बांगलादेशमधील व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये जमावाने एका हिंदू व्यक्तीवर दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला गेला आहे.

तपास :

@JPG2311 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. व्हिडीओमध्ये लोक तलावात पोहणाऱ्या व्यक्तीवर दगडफेक करताना दिसत आहेत. १५०० इस्लामवाद्यांच्या जमावाने मौलवी बाजारच्या सरगनाल, जुरी उपजिल्हा या गावातील हिंदू कुटुंबावर हल्ला केला. त्यांनी त्याची पत्नी आणि मुलीवर त्याच्यासमोर बलात्कार केला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने तलावात उडी मारली. पण, इस्लामवाद्यांच्या जमावाने त्याला दगड फेकून मारले. इतर युजर्सदेखील असाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही बांगलादेशातील एक वरिष्ठ फॅक्ट चेकर तौसिफ अकबर यांच्याशी संपर्क साधून, आमचा तपास सुरू केला. त्यांनी माहिती दिली की, व्हिडीओमध्ये अखौराचे महापौर तकझिल खलिफा काजोल हे (Takzil Khalifa Kajol) हल्लेखोर जमावापासून दूर पोहत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ बांगलादेशच्या महापौरांचा आहे; ते शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर स्वत:ला जमावापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत होते.

या घटनेचा व्हिडीओ रिपोर्टही त्यांनी आमच्यासोबत शेअर केला आहे.

त्यानंतर आम्ही घटनेबद्दल अधिक माहितीचा शोध घेतला. तेव्हा आम्हाला ढाका पोस्टवरील अहवालही मिळाला.

पोस्ट पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा…

https://www-dhakapost-com.translate.goog/country/297561?_x_tr_sl=bn&_x_tr_tl=en&_x_tr_hl=en&_x_tr_pto=sc&_x_tr_hist=true

रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर अवामी लीगचे नेते, कार्यकर्ते यांच्यावर आणि त्यांची घरे, कार्यालये यांच्यावर हल्ले सुरू आहेत. तसेच ब्राह्मणबारियातील विविध भागांत अशाच घटना घडत आहेत. मात्र, अखौरा नगरपालिकेच्या बलाढ्य नगराध्यक्ष तकझिल खलिफा काजोल यांच्या पलायनाने चर्चेला उधाण आले आहे.

आम्हाला त्यावरील आणखी काही अहवालदेखील सापडले आहेत.

निष्कर्ष : बांगलादेशातील अखौरा येथील महापौर तकझिल खलिफा काजोल यांच्या पलायनाचा व्हिडीओ एका हिंदूला दगडाने ठेचून ठार मारल्याचा दावा करून शेअर केला जात आहे. पण, आम्ही शोध घेतल्याप्रमाणे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.