Jeffrey Epstein Files Viral Photo : जेफ्री एपस्टीनसंबंधित न्यायालयीन कागदपत्रांच्या नवीन आवृत्त्यांची जगभरात चर्चा सुरू असतानाच, सोशल मीडियावर दिग्गज राजकीय नेत्यांबद्दल खळबळजनक दावे केले जात आहेत. भारतात एक्स (ट्विटर) आणि इतर प्लॅटफॉर्मवर काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख एपस्टीन फाइल्समध्ये असल्याचा दावा केला जात आहे. तपासणी आणि सखोल पडताळणीनंतर लाईटहाऊस जर्नलिझमला असे आढळले की, हे फोटो अधिकृत नसून, ते कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा वापर करून तयार केले असून,डिजिटली फेरफार केलेले आहेत.
काय होत आहे व्हायरल?
@Saffron_Anil_ एक्स (ट्विटर) युजरने एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी दिसत होते.
@kaushiks0390 या एक्स (ट्विटर)देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी इप्स्टीन फाइल्समध्ये दिसत असल्याचा दावा करणारा एक फोटो शेअर केला…
हे दोन्ही फोटो अत्यंत सारखे होते. इतर सोशल मीडिया युजर्सनीदेखील अशाच प्रकारचे फोटो विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केले होते…
https://www.facebook.com/groups/3303768196514685/posts/4452766891614804
तपास…
आम्ही दोन्ही फोटोंना एकाच वेळी ‘रिव्हर्स इमेज सर्च’ करून आमच्या तपासाला सुरुवात केली. कोणत्याही विश्वसनीय न्यूज मीडिया वेबसाईटवर सोशल मीडियावर शेअर केले जाणारे हे फोटो आढळले नाहीत.
त्यानंतर लाईटहाऊस जर्नलिझमने हे दोन्ही फोटो एआय डिटेक्टर्स (AI detectors)द्वारे तपासून पाहिले. राहुल गांधींच्या फोटोच्या खालच्या उजव्या बाजूला एक ‘वॉटरमार्क’ होता, ज्यावरून हे स्पष्ट होत होते की, हा फोटो एआय वापरून बनवला आहे.

Google Gemini च्या synthID द्वारे मिळालेली माहिती…
“राहुल गांधी आणि जेफ्री इप्स्टीन यांचा हा फोटो एआयद्वारे तयार केलेला आहे. तांत्रिक विश्लेषणानुसार या फोटोमध्ये डिजिटल वॉटरमार्क आहे, जो दर्शवतो की, हा फोटो गूगलच्या AI टूल्सद्वारे तयार किंवा एडिट केला गेला आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोबाबतही डिटेक्टर्सनी असे सुचवले की, हा फोटो डिजिटली एडिट केलेला आहे.


निष्कर्ष
इप्स्टीन फाइल्समध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे दर्शवणारे व्हायरल फोटो डिजिटली फेरफार केलेले आणि एआय जनरेटेड आहेत. त्यामुळे व्हायरल झालेला दावा खोटा आहे.

