fact check of Indians washing clothes in fountain : लाईटहाऊस जर्नालिझम (Lighthouse Journalism)ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले, ज्यामध्ये असा दावा केला जात होता की, काही भारतीय पर्यटकांनी मॉस्कोमधील ‘फ्रेंडशिप ऑफ नेशन्स’ (Friendship of Nations) कारंजात आपले कपडे धुतले. पण, तपासादरम्यान आम्हाला असे दिसून आले की, हा व्हिडीओ एआय जनरेटेड (कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेला) आहे आणि व्हायरल झालेला दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युजर instanews_big ने व्हायरल व्हिडीओ शेअर करताना असा दावा केला की, “मॉस्कोमध्ये काही भारतीयांनी थेट ‘फ्रेंडशिप ऑफ नेशन्स’मधील कारंजात कपडे धुण्याचा निर्णय घेतला…”
https://www.instagram.com/reel/DYOM5chTZCj
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत…
तपास…
आम्ही व्हिडीओमधील महत्त्वाच्या फ्रेम्सवर (keyframes) ‘रिव्हर्स इमेज सर्च’ करून तपासाला सुरुवात केली.
त्यामुळे आम्हाला KOMETA या यूट्यूब चॅनेलवर ५ एप्रिल २०२६ रोजी अपलोड केलेल्या अशाच एका व्हिडीओचा शोध लागला)??? त्याची कॅप्शन होती… ‘Indians at VDNKh climbed into a fountain and started washing clothes.’
मात्र, त्या व्हिडीओच्या टॅगमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्सचा वापर करून तयार करण्यात आला आहे.
त्यानंतर आम्ही हा व्हिडीओ डाऊनलोड केला आणि HIVE Moderation या एआय कंटेंट डिटेक्टरद्वारे त्याची चाचणी केली. निकालांनुसार, हा व्हिडीओ एआय टूल्स वापरून बनवल्याची शक्यता ९९.९ टक्के आहे.
निष्कर्ष
रशियन कारंजात भारतीय पर्यटकांनी कपडे धुतल्याचा दावा करणारा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खोटा असून, तो पूर्णपणे एआय जनरेटेड आहे…
