Fact Check Of Viral Photo Of Indian Pilot Funeral : भारत-पाकिस्तान ताण आणि ऑपरेशन सिंदूरनंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानी सशस्त्र दलांकडून भारतीय विमानाचे नुकसान केल्याचा दावा करणारी अनेक दृश्ये मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहेत. काही ठिकाणी अंत्यसंस्कारांचे फोटोसुद्धा शेअर केले आणि दावा केला की, ते राफेल विमानाच्या वैमानिकाचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

पण, तपासादरम्यान आम्हाला हा फोटो जुना आणि असंबंधित असल्याचे आढळले आहे. तसेच, भारताने असे म्हटले आहे की, सर्व भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे वैमानिक घरी परतले आहेत.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर्स @Ch Naveed यांनी खोट्या दाव्यासह फोटो शेअर केले आहेत आणि ‘७ मे रोजी पाकिस्तानी हवाई दलाशी झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडलेले राफेल विमानाचे वैमानिक स्क्वाड्रन लिडर रोहित कटारिया (३२२९२) यांचे अंतिम संस्कार आज धर्मशाळा येथे होत आहे’, अशी कॅप्शन दिली आहे.

इतर युजर्सदेखील त्याच दाव्यासह फोटो शेअर करत आहेत.

तपास :

आम्ही फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च केले.

आम्हाला स्टॉक इमेजेस वेबसाइट, अलामीवर एक फोटो सापडला.

फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, बुधवारी १६ एप्रिल २००८ रोजी, अहमदाबाद, भारताच्या दक्षिणेस सुमारे १७५ किलोमीटर (१०८ मैल) अंतरावर असलेल्या बोडेलीजवळील बामरोली गावात पंधरा शाळकरी मुलींच्या सामूहिक अंत्यसंस्काराला लोक उपस्थित होते. बुधवारी पहाटे पश्चिम भारतात एक बस सुमारे ५० फूट (१५ मीटर) कालव्यात कोसळली, ज्यामध्ये परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या किमान ४१ शाळकरी मुलांचा आणि इतर तीन जणांचा मृत्यू झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

२००८ मध्ये झालेल्या या अपघातात सुमारे ४४ मुले मृत्युमुखी पडली होती.

https://www.nbcnews.com/id/wbna24152385

आम्हाला cnn.com वर त्याच कॅप्शनसह एक फोटोदेखील सापडला.

अलीकडच्या पत्रकार परिषदेत, एअर मार्शल ए. के. भारती यांनी सांगितले की, सर्व भारतीय विमानातील वैमानिक सुरक्षितपणे परतले आहेत.

https://timesofindia.indiatimes.com/india/all-our-pilots-are-back-home-air-marshal-ak-bharti-confirms-as-india-strike-inside-pakistan/articleshow/121082943.cms

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष : २००८ मध्ये गुजरातमधील बामरोली येथे १५ शाळकरी मुलींच्या अंत्यसंस्काराचा एक जुना फोटो भारतीय पायलटच्या अंत्यसंस्काराच्या दाव्यासह अलीकडील म्हणून शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे.