अंकिता देशकर

Tom Cruise Viral Photo Fact Check: सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात दररोज हजारो फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र व्हायरल होणारे सर्वच फोटो, व्हिडीओ खरे असतात असं नाही. कारण अनेक फोटो एडीट केलेले असतात, जे पाहून नेटकऱ्यांध्ये संभ्रम निर्माण होतो. सध्या सोशल मीडियावर हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार टॉम क्रूझचे असेच काही फोटो व्हायरल होत आहेत. जे फोटो त्याने त्याच्या मिशन इम्पॉसिबल ७ या चित्रपटाच्या रिलीजनंतर स्टंट डबल्सबरोबर घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. पण या व्हायरल फोटोंचे लाईटहाऊस जर्नालिज्मने फॅक्ट चेक केलं असता ते खोटे आणि AI निर्मित असल्याचं समोर आलं आहे.

A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
only 5 rupees lemon will clean the kettle
५ रुपयाचे लिंबू करेल केटलची चकचकीत सफाई! पाहा व्हायरल जुगाड व्हिडीओ

लाईटहाऊस जर्नालिज्मला टॉम क्रूझचे काही फोटो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळले. हे फोटो टॉम क्रूझचे असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या फोटोंचे फॅक्ट चेक केले असता ते फोटो AI निर्मित आणि खोटे असल्याचे समोर आलं आहे.

नेमकं काय होतंय व्हायरल?

फेसबुक यूजर Movies World ने व्हायरल फोटो शेअर केले आहेत आणि लिहलं आहे, Tom Cruise’s stunt doubles celebrating after the release of Mission Impossible 7

या पोस्टचे संग्रहित फोटो बघा.

https://web.archive.org/web/20230609110845/https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=pfbid02ntwd8h3C17KnG6Vxrnh3WfdGyBG1vefaSfMjnJRFHcFdd7xLzCzXycVyvtzAuB4Sl&id=100057492847892

बाकी यूजर्स देखील याच दाव्यासह हे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

हेही पाहा – स्टारबक्सच्या कॉफीवर बसल्या जागी २१० रुपयांचं डिस्काउंट, कसं काय? ‘हा’ जुगाड पाहून म्हणाल, “काय डोकं”

तपास –

आम्ही हे फोटो लक्षपूर्वक बघून त्याचा तपास सुरु केला. या चित्रांचे बॅकग्राउंड धूसर असल्याचे आमच्या लक्षात आले. यामुळे आम्हाला व्हायरल फोटोंबाबत संशय आला, कि हे फोचो AI निर्मित असू शकतात. तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही ‘Tom Cruise’s stunt doubles’ हे किवर्डस वापरून फेसबुकवर शोध सुरु केला असता आम्हाला ज्याने हे फोटो बनवले त्यांची पोस्ट सापडली.

Ong Hui Woo ने हे फोटो Midjourney official या फेसबुक ग्रुप वर पोस्ट केले होते. त्यांनी असे देखील म्हंटले होते की हे फोटो मिडजर्नीचा वापर करून बनवण्यात आले आहेत. त्यांनी अजून एक पोस्ट केली ज्यात त्यांनी म्हंटले होते कि त्यांनी बनवलेल्या फोटोंवर संपूर्ण जग विचार करत आहे की ते खरे आहेत की खोटे.

आम्ही शेअर होत असलेल्या आठ फोटोंचे ‘Optic AI or Not’ वापरून तपास केला. त्यात आम्हाला कळले कि हे चित्र नक्कीच AI निर्मित आहेत.

निष्कर्ष –

मिशन इम्पॉसिबल ७ च्या रिलीझनंतर टॉम क्रूझ आणि त्याचे स्टंट डबल्स म्हणून शेअर केले जाणारे व्हायरल फोटो ‘मिडजर्नी’ वापरून बनवले आहेत. चित्रांचे निर्माते Ong Hui Woo आहेत.