Fact Check : बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना या आश्रयासाठी भारतात आल्या आहेत. त्यानंतर बांगलादेशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडताना दिसून आली. बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराचे व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर यूजर्स तीव्र निषेध व्यक्त करत आहे.

सोशल मीडियावर बांगलादेशातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण या व्हिडीओमध्ये कोणते व्हिडीओ खरे आहेत आणि कोणते व्हिडीओ खोटे आहेत, हे समजून घेणे अवघड जात आहे.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भगव्या रंगाचे कपडे परिधान केलेले लोक रॅलीत सहभागी होताना दिसले. हिंदुंवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ढाका येथे ही रॅली काढण्यात आली, असा दावा करण्यात आला आहे. पण खरंच हा व्हिडीओ ढाका येथील आहे का ? या विषयी सविस्तर जाणून घेऊ या.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Prof. Sudhanshu ने हा व्हिडीओ शेअर करत हा व्हिडीओ ढाका येथील असल्याचा दावा केला आहे.

या पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

https://archive.ph/nJYQH

हेही वाचा : पालकांनो, लहान मुलांना सोन्याचे दागिने घालताय? मग ‘हा’ धक्कादायक Video पाहाच; कशा प्रकारे होतेय चोरी

इतर यूजर्सनी सुद्धा असेच दावे करत व्हिडिओ शेअर केले आहेत.

तपास:लाइटहाऊस जर्नालिझमने यावर तपास केला. व्हिडिओमधून कीफ्रेम मिळवून आणि नंतर त्यावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च करून नीट तपासले. तपासादरम्यान त्यांना
फेसबुकवर अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला.

हा तोच व्हिडिओ होता जो वरील यूजर्सनी व्हिडीओ ढाका येथील असल्यालाचा दावा करत शेअर केला होता.

व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, ” प्रिय नेते फहमी गुलंदाज बाबेल खासदार गफारगाव विद्यार्थी लीगच्या नेतृत्वाखाली ढाक्याचे रस्त्यावर पुन्हा एकदा इतिहास रचला.

त्यानंतर आम्ही यावर कीवर्ड शोध घेतला आणि @channel24digital या चॅनेलवर YouTube शॉर्ट्सवर अपलोड केलेला व्हिडिओ आम्हाला सापडला.

हा व्हिडिओ १ सप्टेंबर २०२३ रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “मोठ्या मिरवणुकीसह BCL रॅलीमध्ये नेते आणि कार्यकर्ते”

आम्हाला निषेधाचा आणखी एक व्हिडिओ सापडला, या व्हिडिओच्या प्रत्येकजण काळे कपडे घातलेले दिसत होते.

त्यानंतर आम्ही बांगलादेशचे वरिष्ठ फॅक्ट चेकर तौसीफ अकबर यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी सांगितले केली की हा व्हिडिओ वर्ष २०२३ चा आहे आणि ही रॅली विद्यार्थी लीग (अवामी लीगची विद्यार्थी शाखा) ची आहे.

निष्कर्ष: सप्टेंबर २०२३ मध्ये विद्यार्थी लीगच्या सदस्यांच्या रॅलीचा जुना व्हिडिओ आहे. हा व्हिडीओ आता बांगलादेशातील हिंदूंच्या रॅलीचा सांगत सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.