Bangladesh Viral Video : शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी बांगलादेश सोडला. पण, सोशल मीडियावर बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे, असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या हिंसाचारात हिंदू लोकांना टार्गेट केले जात आहे, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज आणखीन एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये एका हिंदू महिलेला एक तर इस्लामचा स्वीकार कर किंवा बांगलादेश सोडून जा, असे सांगण्यात आले. त्यामुळे ही हिंदू महिला ढसाढसा रडताना दिसते आहे.

तसेच व्हिडीओमध्ये १२ ऑगस्ट २०२४ ही तारीख नमूद करण्यात आली होती. तसेच तपासादरम्यान आम्हाला आढळून आले की, व्हिडीओ जुना आहे आणि व्हिडीओमध्ये दिसणारी महिला बांगलादेशी अभिनेत्री अजमेरी हक बधोन आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर @VIKRAMPRATAPSIN ने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बांगलादेशातील व्हिडीओ. एक तर धर्मांतर करा किंवा बांगलादेश सोडा. हे ऐकून हिंदू महिला रडत आहेत. ते स्वतःच्या घरापासून दूर कुठे जातील? लोकांनो तुम्ही तिच्या वेदना ऐकू आणि अनुभवू शकता का?, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही पोस्टवरील कमेंट बघून आमची तपासणी सुरू केली. काही कमेंटमध्ये असे सुचवले आहे की, व्हिडीओमध्ये दिसणारी महिला बांगलादेशी अभिनेत्री अझमेरी हक्क बधोन आहे. त्यानंतर आम्ही या गोष्टीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

हा व्हिडीओ १ ऑगस्टचा असल्याचेही कमेंटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर आम्हाला समकाळ न्यूज या यूट्यूब चॅनेलवर १ ऑगस्ट २०२४ रोजी अपलोड केलेला कोटा विरोधातील व्हिडीओ सापडला.

व्हिडीओचे शीर्षक होते : आम्ही देश सुधारू -अभिनेत्री बंधन

जमुना एंटरटेन्मेंटवर अपलोड केलेला व्हिडीओही आम्हाला सापडला.

हेही वाचा…VIDEO: बांगलादेशात हिंदू व्यक्तीवर क्रूर हल्ला? जमावाने पाण्यात उभं करून केली दगडफेक; नक्की घडलं तरी काय?

आम्हाला १ ऑगस्ट २०२४ रोजी अपलोड केलेल्या Rtv बातम्यांवरील बातम्यांचा अहवाल देखील सापडला.

बातमी पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.rtvonline.com/english/entertainment/15848

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अभिनेत्री अजमेरी हक बधोनने गुरुवार, १ ऑगस्ट २०२४ रोजी फार्मगेट परिसरात हजेरी लावली; जिथे काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या वतीने बोलताना तिला अश्रू अनावर झाले. तेव्हा रॅलीत मायक्रोफोन हातात धरून रडत रडत अभिनेत्री अजमेरी हक बधोन म्हणाल्या की, ‘आज त्या जागी तुमची मुलेसुद्धा असू शकतात. आपण असे जगू शकत नाही. हे थांबलेच पाहिजे. आपल्या सर्वांना राज्याला न्याय हवा आहे’.

आणखी एका बातमीत आम्हाला या घटनेचा उल्लेख आढळला. त्यात अभिनेत्री अजमेरी हक बधोन, “गोळीबार सुरू झाल्यापासून आम्ही मानसिकदृष्ट्या स्वस्थ नाही. आम्ही विद्यार्थ्यांशी हळहळ व्यक्त करतो; ज्यांना मारले गेले त्यांना न्याय हवा आहे”, असे म्हणाल्या आहेत.

बातमी पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://en.prothomalo.com/bangladesh/a5iwhdkiaq

डेलीसनमध्ये आम्हाला आणखी एक बातमी मिळाली. बातमी पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.daily-sun.com/post/760058

तसेच रिपोर्टमध्ये नमूद केले आहे की, अभिनेते ममुनुर रशीद, मोशर्रफ करीम, अजमेरी हक बधों, सयाम अहमद, रफियाथ रशीद मिथिला, झाकिया बारी मामो, इरेश झाकेर, नाझिया हक ओरशा, नुसरत इमरोज तिशा, सबिला नूर, शोहेल मंडोल, चित्रपट निर्माते अमिताभ रजा चौधरी, अशफान चौधरी, सय्यद अहमद शौकी, रेडोअन रोनी आदी लोक रॅलीत उपस्थित होते.

रॅलीत उपस्थितांनी, विद्यार्थ्यांच्या हत्येचा हिशोब आणि खटला चालवावा, गोळीबार, हिंसाचार, सामूहिक अटक, छळ केलेल्या विद्यार्थ्यांची सुटका व्हावी, अशी मागणी केली. अझमेरी हक्क बधोन म्हणाल्या, “मी विद्यार्थ्यांबरोबर आहे म्हणून आज आम्ही येथे आलो आहोत.”

तपासादरम्यान आम्ही बांगलादेशातील तथ्य तपासणाऱ्या तन्वीर महताब अबीरशीदेखील संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, ती महिला अझमेरी हक्क बधोन नावाची अभिनेत्री आहे, जी मुस्लिम आहे आणि हा व्हिडीओ १ ऑगस्टचा आहे.

निष्कर्ष : बांगलादेशी अभिनेत्री अझमेरी हक्क बधोनचा व्हिडीओ एका हिंदू महिलेला देश सोडण्यासाठी प्रवृत्त केले जातेय, या दाव्यासह शेअर केला जातो आहे. पण, आम्हाला तपासात असे आढळून आले की, हा व्हिडीओ १ ऑगस्टचा आहे आणि व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.