Tirupati Balaji Pujari Fact check : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिरुपती बालाजी मंदिराशी संबंधित एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. या व्हिडीओत तिरुपती बालाजी मंदिरातील एका पुजाऱ्याच्या घरातून १२८ किलोपेक्षा जास्त सोने, १५० कोटी रुपये रोकड आणि ७० कोटींचे हिरे जप्त केल्याचा दावा करण्यात आला. या व्हिडीओमध्ये पोलिस ठाण्यामधील एका टेबलवर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने पसरवून ठेवल्याचे दिसत आहेत. तर आजूबाजूला अनेक लोक आणि पोलिसही उभे असल्याचे दिसतेय. दरम्यान, हाच व्हिडीओ तिरुपती बालाजी मंदिरातील पुजाऱ्याच्या घरातून जप्त केलेल्या दागिन्यांचा असल्याचे सांगून व्हायरल केला जात आहे; पण आम्ही जेव्हा व्हिडीओची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक वेगळीच माहिती समोर आली, ती नेमकी काय आहे जाणून घेऊ….

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर @SanjuSaran_ने तिच्या अकाउंटवर हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.

New demat account openings slow down
नवीन डिमॅट खाते उघडण्याचा वेग मंदावला
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास :

आम्ही पोस्टच्या कमेंट सेक्शनचे निरीक्षण करून तपासाची सुरुवात केली आणि अनेक सोशल मीडिया युजर्सनी शेअर केलेला व्हिडीओ खोटा असल्याचे आणि तो तामिळनाडूच्या वेल्लोरमधील दरोड्याचा असल्याचे म्हटले आहे.

कीवर्ड सर्च केल्यावर आम्हाला २०२१ मधील या घटनेबद्दल बातम्या सापडल्या.

वापरलेले फोटो व्हायरल व्हिडीओतील फोटोंशीच मिळते- जुळते होते.

बोट दुर्घटनेचा थरारक LIVE VIDEO? बघता बघता शेकडो लोक बोटीसह खोल समुद्रात बुडाले; VIRAL VIDEO खरंच मुंबईतील दुर्घटनेचा? वाचा सत्य

या बातमीत म्हटले आहे (भाषांतर) : पोलिसांनी १५ डिसेंबर रोजी वेल्लोरमधील एका लोकप्रिय दागिन्यांच्या शोरूममध्ये झालेल्या दरोड्याच्या प्रकरणी सोमवारी एका आरोपीला अटक केली, यावेळी ओडुकाथूरमधील एका दफनभूमीतून आठ कोटी रुपयांचे १५.९ किलो चोरीचे सोने आणि हिरे जप्त केल्याचा दावा केला आहे.

२० डिसेंबर २०२१ रोजी पोस्ट केलेल्या पत्रकार महालिंगम पोनुसामी यांच्या एक्स प्रोफाइलवर आम्हाला असाच एक व्हिडीओ सापडला.

आम्हाला दरोड्याचे काही व्हिडीओ रिपोर्ट्सदेखील सापडले.

दरोड्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे: https://www.youtube.com/watch?v=y1B_ULjKVaU

अलीकडे कोणत्याही तिरुपती मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरावर छापा टाकल्याची बातमी सापडली नाही.

निष्कर्ष :

तामिळनाडूतील वेल्लोर येथे दागिन्यांच्या शोरूममध्ये दरोडा टाकल्यानंतर जप्त केलेल्या सोन्याचा व्हिडीओ पुन्हा एकदा तिरुपती मंदिराच्या पुजाऱ्याच्या घरावर छापा टाकल्याच्या खोट्या दाव्यांसह व्हायरल केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आणि खोटा आहे.

Story img Loader