Fact check: ओमायक्रॉन व्हेरिएंटवर १९६३ मध्येच आला होता चित्रपट?; जाणून घ्या व्हायरल पोस्टरबाबत

ज्या दिवशी पृथ्वी स्मशानभूमीत बदलली! अशी या पोस्टरची टॅगलाइन आहे.

Vintage movie poster The Omicron Variant fake
(फोटो सौजन्य- ट्विटर)

भारतात गुरुवारी करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या दोन रुग्णांची नोंद झाल्यानंतर, द ओमिक्रॉन व्हेरिएंट नावाच्या अस्तित्वात नसलेल्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. विज्ञान-कथा आणि भयपटाची थीम असलेल्या पोस्टरमध्ये दोन लोक तारांकित आकाशाकडे पहात असल्याचे चित्र आहे. त्यांच्या मागे रक्ताळलेल्या हातात एक मुंगी आहे. ज्या दिवशी पृथ्वी स्मशानभूमीत बदलली! अशी या पोस्टरची टॅगलाइन आहे.

भारतात ओमायक्रॉनच्या दोन प्रकरणांची नोंद झाल्यानंतर ट्विटरवर #OmicronVarient शीर्षस्थानी ट्रेंड करू लागला. या दरम्यानच “द ओमिक्रॉन व्हेरिएंट” नावाच्या चित्रपटाचे एक स्पष्ट पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हा सिनेमा १९६३ मध्ये रिलीज झाल्याचे बोलले जात आहे.

या कथित पोस्टरने पुन्हा एकदा करोना हे षड्यंत्र असल्याचा सिद्धांतांना चालना दिली. नेटिझन्सनी साथीच्या रोगाची योजना बऱ्याच काळापासून होती असेही म्हटले आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी देखील पोस्टर शेअर करत विश्वास ठेवा हा चित्रपट १९६३ मध्ये आला होता..टॅगलाइन पहा, असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाच्या अस्तित्वात नसलेल्या चित्रपटाची जाहिरात करणारे फोटोशॉप केलेले पोस्टर काही सोशल मीडिया युजर्सना करोना व्हायरस नियोजित असल्याचा दाखवून फसवले जात आहे. मात्र हे पोस्टर विज्ञान-कथा आणि भयपटाच्या थीमवर आधारित आहे.

आयरिश दिग्दर्शक बेकी चीटल यांनी हे पोस्टर तयार केले आहे. त्यांच्या १९७४च्या Sucesos en la cuarta fase (फेज ४) नावाच्या स्पॅनिश चित्रपटाचे पोस्टर एडिट करून बनावट The Omicron Variant पोस्टर तयार केले आहे.

स्पॅनिश पोस्टरवरील टॅगलाइनचे भाषांतर “The Day The Earth was turned into a cemery!” असे आहे. चीटल यांनी ट्विटरवर सांगितले की हे पोस्टर खोटे आहे, जे त्यांनी मनोरंजनासाठी बनवले आहे कारण कोविड-१९चे नाव क्लासिक सायन्स-फिक्शन चित्रपटासारखे वाटत आहे.

दरम्यान, भारतातही ओमायक्रॉनची प्रकरणे आढळून आली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, कर्नाटकात ओमायक्रॉनची दोन प्रकरणे आढळून आली आहेत.

“दोन्ही व्यक्तींनी दक्षिण आफ्रिकेतून प्रवास केला होता. त्यांचे निरीक्षण केले जात आहे,” असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयएमआरसी) महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. “ओमायक्रॉनशी संबंधित सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. अशा सर्व प्रकरणांमध्ये, देशात आणि परदेशात, ओमिक्रॉन संसर्गामध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळली नाहीत,” असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fact check vintage movie poster the omicron variant fake abn