fact check Narendra Modi professional photoshoot : ‘लाईटहाऊस जर्नलिझम’ला ९ एप्रिल रोजी केरळमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो शेअर केलेला आढळला. त्या फोटोबरोबर असा दावा करण्यात आला होता की, पंतप्रधान मोदी केरळमधील रॅलीसाठी गेले असताना एका क्रूद्वारे त्यांचे व्यावसायिक फोटोशूट केले जात आहे. तपासादरम्यान आम्हाला असे आढळले की, हे छायाचित्र एआय-जनरेटेड (कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेले) असून, ते खरे नाही. त्यामुळे व्हायरल झालेला दावा खोटा आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर @LambaAlka अलका लांबा यांच्या अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी नारळ हातात धरून फोटोशूट करताना दिसत आहेत. तसेच या फोटोला पाहून ‘केरळमध्ये रील बनवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह हाच फोटो शेअर करत आहेत…

तपास…

फोटोतील अनेक विसंगतींवरून हा फोटो एआय-जनरेटेड असल्याचे समजले.

‘गूगल रिव्हर्स इमेज सर्च’मध्ये याबद्दल कोणतेही पुरावे आमच्यासमोर आले नाहीत.

त्यानंतर आम्ही हा फोटो एआय डिटेक्टर (AI detectors) साधनांद्वारे तपासून पाहिला.

‘HIVE Moderation’ नुसार, हा फोटो ९९.९% एआय-जनरेटेड असण्याची शक्यता आहे. तसेच, हा फोटो १२ टक्के ‘डीपफेक’ असण्याची शक्यता या विश्लेषणातून समोर आली.

‘sightengine.com’ या दुसऱ्या एआय डिटेक्टरने हा फोटो ९८ टक्के एआय-जनरेटेड असल्याचे स्पष्ट केले.

निष्कर्ष

हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केरळ निवडणूक प्रचारादरम्यानच्या फोटोशूटचे असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जाणारा फोटो एआय-जनरेटेड आहे. त्यामुळे व्हायरल झालेला दावा खोटा आहे.