car skidding on snow viral video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले; ज्यामध्ये एक कार बर्फाच्छादित रस्त्यावर घसरताना दिसत आहे. या व्हिडीओबरोबर असा दावा केला जात होता की, हा व्हिडीओ भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘मनाली’ येथील आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ अलीकडचा नसून जुना आहे आणि तो मनालीचा नसून तुर्कीमधील (Turkey) आहे.

काय होत आहे व्हायरल?

@Cric_sudama नावाच्या एक्स (ट्विटर) युजरने सोशल मीडिया प्रोफाइलवर हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्स देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत…

https://www.facebook.com/watch/?v=1267894945180545

https://www.facebook.com/reel/765049319404850

तपास:

आम्ही या पोस्टमधील व्हिडीओच्या की-फ्रेम्स (keyframes) मिळवून रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

एका स्क्रीनशॉटमुळे आम्ही aa.com.tr वरील एका बातमीपर्यंत पोहोचलो.

https://www.aa.com.tr/tr/gundem/malatyada-buzlanma-nedeniyle-kayan-otomobilin-baska-bir-araca-carpma-ani-cep-telefonu-kamerasiyla-kaydedildi/3783964

या बातमीचे कॅप्शन होते; मालत्यामध्ये (Malatya) बर्फामुळे कार घसरून दुसऱ्या वाहनाला धडकल्याचा क्षण फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाला.

बातमीनुसार, “मालत्या प्रांतातील येसिल्युर्ट जिल्ह्यात जोरदार बर्फवृष्टीनंतर बर्फ साचल्यामुळे एक कार घसरली आणि दुसऱ्या कारला धडकली, ही घटना फोनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे…”

आम्हाला असेही आढळले की, हा व्हिडीओ ३० डिसेंबर रोजी ‘Mynet’ (तुर्कीमधील एक अग्रगण्य इंटरनेट प्लॅटफॉर्म) वर अपलोड करण्यात आला होता.

https://www.facebook.com/mynet/videos/25565588333058104

त्याचे कॅप्शन होते – मालत्यामध्ये बर्फाळ परिस्थितीमुळे कार घसरून दुसऱ्या वाहनाला धडकल्याचा क्षण मोबाईल फोनमध्ये शूट करण्यात आला आहे.

आम्हाला या घटनेबद्दल haber49.net वर आणखी एक बातमी आढळली.

https://haber49.net/malatyada-buzlanma-kazaya-neden-oldu-park-halindeki-arac-devrildi

बर्फवृष्टीमुळे रस्त्यांची सध्याची परिस्थिती तपासण्यासाठी लाईटहाऊस जर्नलिझमने गुगल कीवर्ड सर्च केला. आम्हाला विश्वासार्ह बातम्यांचे अहवाल सापडले ज्यात म्हटले होते की, बर्फाळ रस्ते आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे मनालीमध्ये हजारो पर्यटक अडकले होते.

https://timesofindia.indiatimes.com/india/15km-in-10-hours-snow-rush-turns-into-traffic-nightmare-in-manali/articleshow/127502542.cms

निष्कर्ष

तुर्कीमधील डिसेंबर महिन्यातील बर्फाच्छादित रस्त्यावर कार घसरल्याचा एक जुना व्हिडीओ भारतातील मनाली येथील अलीकडचा म्हणून शेअर केला जात आहे. व्हायरल झालेला हा दावा दिशाभूल करणारा आहे.