BJP Leader K Annamalai Danced Video Viral : मुंबईतील महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने केलेल्या दमदार कामगिरीनंतर भाजपा नेते के. अण्णामलाई नुकतेच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आले होते. प्रामुख्याने तमिळनाडू भाजपाचे नेते असूनही, अण्णामलाई यांनी महाराष्ट्रातील राजकारण आणि मुंबईच्या अस्मितेवर केलेल्या विधानांमुळे राज ठाकरे यांच्यासह प्रादेशिक नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान सार्वजनिक शाब्दिक युद्ध आणि व्हायरल झालेला ‘रसमलाई’ टोमणा यांसारखे वाद निर्माण झाले होते.
टीकेला उत्तर देताना अण्णामलाई म्हणाले की, निवडणुकीचे निकाल पाहून जनतेने लोकांमध्ये भांडण, जात-धर्म किंवा प्रदेशाच्या नावावर राजकारण करणाऱ्या विचारांना नकार दिला आहे. भाजपाला मिळालेले यश हे विकासावर आधारित आणि कामकाजावर लक्ष देणाऱ्यांना मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची ही विधाने व त्यांनी टीकाकारांवर केलेले पलटवार यांमुळे ते महाराष्ट्रातील निवडणुकीनंतरच्या राजकीय चर्चेत राहिले आणि या वादाला राष्ट्रीय पातळीवरही लक्ष्य मिळाले.
मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे भाजपा नेते नाचताना दिसत आहेत. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर अन्नामलाई यांनी ठाकरे बंधूंची थट्टा उडवीत जल्लोष करून डान्स केला, असा दावा केला जात आहे. तपासादरम्यान आम्हाला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले असून, व्हायरल झालेला व्हिडीओ जुना असल्याचे निष्पन्न झाले आहे.
काय होत आहे व्हायरल?
‘Sanatani Thakur’ नावाच्या एक्स (ट्विटर) युजरने आपल्या प्रोफाईलवर हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशाच दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.
https://www.facebook.com/groups/1009021666217358/posts/2399163510536493
https://twitter.com/ravibjptn/status/2012222261286343136 https://www.instagram.com/reel/DTkQbTwAdZs/
तपास…
आम्ही या व्हिडीओतील कीफ्रेम्सवर (रिव्हर्स इमेज सर्च) शोध घेऊन तपास सुरू केला. आम्ही गूगल कीवर्ड सर्चच्या मदतीने शोध घेतला असता, ‘Galatta Media’ च्या फेसबुक प्रोफाईलवर २०२३ मधील एक व्हिडीओ आम्हाला सापडला. https://www.facebook.com/watch/?v=7389646514396880
त्या व्हिडीओचे कॅप्शन होते… आम्ही अण्णामलाई यांना यापूर्वी कधीही नाचताना पाहिले नव्हते. आता पाहा!
आम्हाला हाच व्हिडीओ यूट्यूबवरही सापडला…
या व्हिडीओची एक मोठी आवृत्ती ‘Nation First’वर दोन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आली होती.
त्याचे वर्णन असे करण्यात आले होते की, पदयात्रेदरम्यान अण्णामलाई यांचा डान्स | भाजपा अन्नामलाई डान्स व्हिडीओ | एन मन्न एन मक्कल (माझी माती, माझे लोक)
निष्कर्ष
भाजपा नेते के. अण्णामलाई महापालिका निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा करताना नाचत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ जुना आहे. हा व्हिडीओ २०२३ मधील असून तमिळनाडूमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या एका पदयात्रेतील आहे. त्यामुळे व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.
