Viral Video Man Demolishing Majid for Airport : ‘लाईटहाऊस जर्नालिझम’च्या निदर्शनास आले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या पोस्टमध्ये असा दावा केला गेला होता की, दुसऱ्या धावपट्टीच्या (रनवे) विस्तारासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी कोलकाता विमानतळावरील १३६ वर्ष जुनी गौरीपूर जामा मशीद पाडली आहे.
आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निष्पन्न झाले. शेअर केला जात असलेला व्हायरल व्हिडीओ जुना असून तो बांगलादेशमधील आहे.
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युजरने @alestiklal_english हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे आणि ‘कोलकाता विमानतळाच्या हद्दीत असलेली १३६ वर्षे जुनी गौरीपूर जामा मशीद दुसऱ्या धावपट्टीच्या विस्तारासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडून पाडण्यात येत आहे’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
https://www.instagram.com/reels/DdoNQJ_iAU3
इतर युजरसुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशाच प्रकारच्या दाव्यांसह हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास
आम्ही काही मुख्य कीवर्डचा (शब्दांचा) वापर करून तपास करायला सुरुवात केली. आम्हाला मशिदीबद्दल काही वृत्त अहवाल (न्यूज रिपोर्ट्स) सापडले.
https://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/state-govt-aligns-with-centre-plan-to-shift-mosque-out-of-airport-gets-renewed-push/articleshow/131250145.cms
यावर्षी मे महिन्यात कोलकाता विमानतळावरील दुय्यम धावपट्टीजवळ असलेली मशीद हलवण्याच्या नवीन प्रयत्नांना राज्य सरकारमध्ये वेग आला. विमानतळाच्या ऑपरेशनल एरियाच्या आत खोलवर असलेल्या मशिदीचे स्थलांतर करण्यासाठी राज्य प्रशासन आणि मशीद प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली आणि त्यानंतर मशिदीची पाहणी करण्यात आली.
जुलै २०२६ मधील आणखी एका अहवालानुसार, १३६ वर्ष जुन्या बांकरा मशिदीत प्रवेश अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. केवळ [Aadhaar Redacted] कार्डच्या आधारे प्रवेश देण्याबाबत विमानतळ प्राधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणांचा हवाला दिला.
https://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/entry-to-airport-mosque-stopped-indefinitely/articleshow/132351179.cms
तर अशा प्रकारचा कोणताही अहवाल आम्हाला आढळला नाही, ज्यात मशीद पाडण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर आम्ही मशिदीचे फोटो तपासले, ऑनलाइन उपलब्ध असलेल्या कोणत्याही चित्रांमध्ये निळ्या रंगाच्या टाईल्स दिसल्या नाहीत.
त्यानंतर आम्ही व्हिडीओमधून घेतलेल्या मुख्य फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला.
आम्हाला अशाच प्रकारच्या दृश्यांचा एक फेसबुक व्हिडीओ सापडला.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “बीएनपी नेते मुस्तफा यांच्या घराची संतप्त लोकांकडून तोडफोड केली जात आहे. हे घर पाबना सदरमधील कुलुनिया गजारीया येथील कोली हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कॅप्शनमध्ये मुस्तफा यांनी कोलीवर बलात्कार करून तिची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते बॅगेत भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्याय मिळत नसल्याने बलात्काराच्या आरोपींची घरे अशाच प्रकारे पाडली पाहिजेत, असेही यात म्हटले आहे.”
आम्हाला १८ सप्टेंबरचा एक अहवालदेखील मिळाला, ज्याची दृश्ये सध्या शेअर केलेल्या दृश्यांशी जुळत आहेत.
https://timestodaybd.com/details/%E0%A6%B6%E0%A6%BF%E0%A6%B6%E0%A7%81%E0%A6%95%E0%A7%87-%E0%A6%A7%E0%A6%B0%E0%A7%8D%E0%A6%B7%E0%A6%A3%E0%A7%87%E0%A6%B0-%E0%A6%AA%E0%A6%B0-%E0%A6%B9%E0%A6%A4%E0%A7%8D%E0%A6%AF%E0%A6%BE-%E0%A6%98%E0%A6%BE%E0%A6%A4%E0%A6%95%E0%A7%87%E0%A6%B0-%E0%A6%AC%E0%A6%BE%E0%A6%A1%E0%A6% moglieBC%E0%A6%98%E0%A6%B0-%E0%A6%AD%E0%A7%8F%E0%A6%99%E0%A7%87-%E0%A6%A6%E0%A6%BF%E0%A6%B2-%E0%A6%8F%E0%A6%B2%E0%A6%BE%E0%A6%95%E0%A6%BE%E0%A6%AC%E0%A6%BE%E0%A6%B8%E0%A7%80
पाबना येथे तिसरीत शिकणारी १० वर्षीय विद्यार्थिनी कामरुन्नाहर कोलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्तफा प्रामाणिक यांच्या घरावर स्थानिक रहिवाशांनी हल्ला करून तोडफोड केली. ही घटना शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी नमाजानंतर पाबना सदर उपजिल्ह्यातील डोगाची युनियनमधील कुलुनिया गावात घडली.
याबाबत आम्हाला आणखी काही वृत्त अहवाल सापडले.
https://samakal.com/rajshahi/article/373521/%E0%A6%B8%E0%A7%8D%E0%A6%95%E0%A7%81%E0%A6%B>E%A6%B6%E0%A6%BF%E0%A6%95%E0%A7%8D%E0%A6%>E%A6%BE%E0%A6%B0%E0%A7%8D%E0%A6%A5%E0%A7%80%E0%A6%95%E0%A7%87-%E0%A6%A7%E0%A6%B0%E0%A7%8D%E0%A6%B7%E0%A6%A3%E0%A7%87%E0%A6%B0-%E0%A6%AA%E0%A6%B0-%E0%A6%B9%E0%A6%A4%E0%A7%8D%E0%A6%AF%E0%A6%BE-%E0%A6%AA%E0%A7%8D%E0%A6%B0%E0%A6%A7%E0%A6%BE%E0%A6%료-%E0%A6%85%E0%A6%BF%E0%A6%B>E%A6%AF%E0%A7%81%E0%A6%95%E0%A7%8D%E0%A6%A4%E0%A7%87%E0%A6%B0-%E0%A6%AC%E0%A6%BE%E0%A6%D0%AC%E0%A6%BF-%E0%A6%AD%E0%A6%BE%E0%A6%99%E0%A6%9>E%A6%BE%E0%A6%B0%E0%A7%8D%E0%A6%A5%E0%A7%80%E0%A6%95%E0%A7%87-%E0%A6%A7%E0%A6%B0%E0%A7%8D%E0%A6%B7%E0%A6%A3
https://bangla.thedailystar.net/news/bangladesh/news-3962581
याच विषयावर आम्हाला एक व्हिडीओ रिपोर्टही मिळाला.
निष्कर्ष
बांगलादेशमधील जमावाने घर पाडल्याचा एक असंबंधित व्हिडीओ कोलकाता विमानतळाजवळील १३६ वर्षे जुन्या मशिदीच्या पाडकामाचा असल्याचा दावा करत भारतातील अलीकडील घटना म्हणून शेअर केला जात आहे. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा आहे.
