Fact Check Bangladeshi People Leaving Country : लाइटहाउस जर्नलिझमला सोशल मीडिया वेबसाइट्सवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये बरेच जण एका लाकडी पुलावरून चालत बोटींमध्ये उतरताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बांगलादेशी स्थलांतरित होऊन घरी परतताना दिसत आहेत असा दावा केला जात होता. एसआयआर (Special Intensive Revision) यांच्या तपासणीच्या भीतीने बांगलादेशी परत जात आहेत असा दावा करण्यात आला आहे.
पण, तपासणीदरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ बांगलादेशातील बंदर शहर असलेल्या मोंगला (Mongla) येथील आहे.
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युजर ‘नेशन मॅटर्स’ (Nation Matters) ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/DQ129yvkpLV
इतर युजर्सदेखील हा व्हिडीओ याच दाव्यासह शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमची तपासणी सुरू केली.
यामुळे मग आम्ही २८ ऑक्टोबर रोजी टिकटॉकवर अपलोड केलेल्या एका व्हिडीओपर्यंत पोहचलो.
हा व्हिडीओ २८ ऑक्टोबर रोजी अपलोड करण्यात आला होता.
व्हिडीओवरील बांगला भाषेत लिहिलेला मजकूर ‘मोंगला’ असा होता, जे बांगलादेशातील एक बंदर शहर आहे.
आम्ही युजर्सचे टिकटॉक तसेच फेसबुक प्रोफाइल तपासले. त्याच ठिकाणचे अनेक व्हिडीओ तिथे होते.
https://www.facebook.com/jecan.ahamad.raju/reels
https://www.facebook.com/reel/1174829973975054
फेसबुक युजर्स ‘एचएम राजू हावलादार’ (HM Raju Hawlader) च्या अनेक व्हिडीओमध्ये मोंगला बंदर (Mongla port) दाखवण्यात आले होते.
आम्हाला अल जझीरा इंग्लिशच्या यूट्यूब हँडलवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये शहराचे असेच दृश्य होते.
मोंगला पोर्ट शहराचे असेच व्हिडीओ यूट्यूबवर दिसले.
रिव्हर्स इमेजमुळे आम्ही टिकटॉकवरील आणखी एका व्हिडीओवर पोहोचलो, जो समोरून (front angle) शूट करण्यात आला होता, पण त्यात समान फ्रेम होत्या.
कॅप्शनमध्ये (Caption) हा बांगलादेशातील मोंगला बंदराचा व्हिडीओ असल्याचे सूचित केले होते.
आम्ही टिकटॉकवर हॅशटॅगदेखील शोधले. त्यामुळे व्हायरल व्हिडीओमधील समान कीफ्रेम असलेले अनेक व्हिडीओ आम्हाला आढळले.
याद्वारे आम्हाला टिकटॉकवर शेअर केलेला व्हायरल व्हिडीओसारखाच एक व्हिडीओदेखील आढळला.
व्हिडीओला ‘मोंगला’ असे कॅप्शन दिले होते.
आम्ही बांगलादेशातील फॅक्ट चेकर तन्वीर महताब आबिर यांच्याशीदेखील संपर्क साधला, ज्यांनी आम्हाला सांगितले, “हा व्हिडीओ मोंगला घाटचा (Mongla Ghat) आहे. जरी मूळ व्हिडीओ मिळत नसला तरीही इतर चित्रांशी तुलना केल्यावर ठिकाण ओळखता आले आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी गर्दी बांगलादेशातील वस्त्रउद्योगातील कामगारांची आहे. कामगार रोज ये-जा करण्यासाठी या घाटाचा वापर करतात. वाहतुकीची साधने कमी आणि कामगारांची संख्या जास्त असल्यामुळे अशा प्रकारची गर्दी तिथे नेहमीच दिसते.
निष्कर्ष : बांगलादेशातील मोंगला बंदराचा एक व्हिडीओ भारतातील पश्चिम बंगालच्या सीमेवरील भागाचा असल्याचा खोटा दावा करून शेअर केला जात आहे. या दाव्यात म्हटले जाते की, बांगलादेशी देश सोडून जात आहेत. पण, तपासानुसार हा दावा दिशाभूल करणारा आहे.
