Man harassing Women Fact Check : लाइटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असणारा एक व्हिडीओ आढळला आहे, ज्यामध्ये अनेक युजर्सनी दावा केला आहे की, हा व्हिडीओ वास्तविक घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आहे. या पोस्ट्सबरोबर असा आरोप करण्यात आला आहे की, व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वार महिलेचा वारंवार छळ करताना दिसत आहे, त्यानंतर त्या महिलेने बंदूक काढली आणि त्याच्यावर गोळीबार केला, ज्यामुळे त्याला पळून जावे लागले. व्हिडीओची सत्यता किंवा तो कोणत्या संदर्भात रेकॉर्ड केला गेला हे सिद्ध होण्याआधी व कोणत्याही पुराव्याशिवाय हा दावा सोशल मीडियावर पसरवण्यात आला आहे.
तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ एआयद्वारे (AI) तयार करण्यात आला आहे. त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (ट्विटर) युजर युजरने @manoj90251 हा व्हायरल व्हिडीओ “अशा लोकांना तर भर बाजारातच अद्दल घडवायला हवी होती… वाचवलं कशाला?” अशी कॅप्शन देऊन खोट्या दाव्यासह शेअर केला आहे.
इतर युजर्स देखील असाच दावा करून हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास
आम्ही व्हिडीओ डाउनलोड करून आणि त्याचे कीफ्रेम्स (keyframes) काढून तपास करायला सुरुवात केली.
आम्हाला हाच व्हिडीओ पोस्ट करणारी कोणतीही विश्वासार्ह प्रोफाइल किंवा याबद्दलचा अहवाल देणारी कोणतीही वृत्तसंस्था आढळली नाही.
पण, आम्हाला व्हिडिओमध्ये काही विसंगती आढळल्या, जसे की दुचाकी वळण्याची पद्धत किंवा बंदुकीतून निघणारी आग. म्हणून, आम्ही तो व्हिडीओ डाउनलोड केला आणि ‘एआय कंटेंट डिटेक्टर’ (AI content detector) द्वारे तपासला.
आम्ही तो प्रथम HIVE मॉडरेशन या एआय कंटेंट डिटेक्टरद्वारे तपासला. या टूलने सूचित केले की “या इनपुटमध्ये एआय जनरेटेड (AI-generated) किंवा डीपफेक (deepfake) कन्टेन्ट असण्याची दाट शक्यता आहे”…

‘detectvideo.ai’ या आणखी एका एआय डिटेक्टरने देखील सूचित केले की ‘अनेक फॉरेन्सिक सिग्नल्समध्ये वाढ दिसून आली आहे, ज्यामुळे हे ५६ टक्के जनरेटेटेड असण्याची शक्यता आहे’.

निष्कर्ष
बुरखा परिधान केलेल्या महिलेने तिचा छळ करणाऱ्या व्यक्तीवर गोळीबार केल्याचा दावा करत व्हायरल होत असलेला व्हिडीओ प्रत्यक्षात एआय जनरेटेड (AI-generated) आहे. त्यामुळे व्हिडीओ आणि त्याबरोबर केला जाणारा दावा दोन्ही दिशाभूल करणारे आणि खोटे आहेत.
