प्राण्यांसंबंधी अनेक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. कुठे एक चिमुकली भल्यामोठ्या अजगरासोबत टीव्ही पाहताना दिसत आहे. तर एक व्यक्ती चक्क नागासोबत खेळत आहे. हे पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. अजून एक थरारक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दोन व्यक्ती झेब्राच्या वेशात धावतानाचे दिसून येते. मात्र त्याला खरा झेब्रा समजून त्यावर सिंहीणींनी हल्ला केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(Viral : चपळतेने एस्केलेटवर चढली मांजर, वरती पोहोचणार तितक्यात.. पाहा हा मजेदार व्हिडिओ)

@closecalls7 या ट्विटर यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये झेब्रासारखा पोषाख घातलेली दोन व्यक्ती झेब्राच्या कळपामध्ये फिरताना दिसत आहेत. यादरम्यान दोन सिंहीणी खरा झेब्रा समजून त्यांच्यावर हल्ला करतात. एका सिंहीणीने या नकली झेब्राच्या तोंडावरच हल्ला केला. तिने पंजा मारताच नकली झेब्राचे मुंडके खाली पडले. हे मुंडके घेऊन सिंहणी तेथून पसार झाली. हल्ला इतका जोरदार होता की ही व्यक्ती पुन्हा असा प्रयोग करण्याची हिंमतच करणार नाही.

हा थरारक व्हिडिओ १ लाख २७ हजारवेळा पाहण्यात आलेला आहे. व्हिडिओला ७ हजार ५०० यूजर्सनी लाईक देखील केले आहे. सिंहीणीच्या हल्ल्यात हा व्यक्ती जखमी देखील झाला असता. व्हिडिओत पुढे त्याचे काय होते हे दाखवण्यात आलेले नाही. मात्र, असा प्रयोग करणे हा धोकादायक ठरू शकतो.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हाती लागलेले मुंडके हे बनावट असल्याचे समजताच सिंहीणीला किती दूख झाले असेल, असे एका यूजरने लिहिले आहे. तर अनेक यूजरना या व्हिडिओने पोट धरून हसवले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake zebra attacked by lioness viral video ssb
First published on: 29-09-2022 at 18:45 IST